Sunny Deol and Amrita Singh's Relationship : बॉलिवूड अभिनेता सनी देओल हा सध्या त्याच्या 'गदर 2' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्याच्या या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगलाच जम बसवला असून 500 कोटींचा आकडा पार केला आहे. या चित्रपटाला मिळालेलं यश पाहता. आता सगळीकडे चर्चा सुरु आहे ती सनी देओलच्या खासगी आयुष्याची. सगळ्यांनाच त्याच्या खासगी आयुष्याविषयी अनेक गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. अशात अनेक मुलाखतींमध्ये त्याच्या खासगी आयुष्यावर प्रश्न विचारता सनी देओल स्पष्टपणे वक्तव्य करताना दिसत आहे. त्यात आता सनी देओलची एक जुनी मुलाखत सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात सनी देओल त्याच्या रिलेशनशिपच्या बातम्यांवर प्रतिक्रिया देताना काय म्हणाला याविषयी सांगितले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सनी देओलनं आयटीएमबीला दिलेली मुलाखत समोर आली आहे. या मुलाखतीत त्याला प्रश्न विचारण्यात आला की अनेक अभिनेत्रींसोबत तुझं नाव जोडण्यात येत. तेव्हा तुझी त्यावर कशी प्रतिक्रिया असते? त्यावर उत्तर देत सनी म्हणाला की खरंतर अशा गोष्टी या होत असतात. हा या खेळाचा भाग आहे. त्यानंतर पुढे त्याला प्रश्न विचारण्यात आला होता की या सगळ्या अफवांचा तेव्हा त्याची होणारी पत्नी म्हणजेच पूजापर्यंत पोहोचतात का? त्यावर उत्तर देत सनी पुढे म्हणाला की 'तिच्यापर्यंत या सगळ्या चर्चा पोहोचतात की नाही हे मला माहीत नाही. पण त्यात असं काही नाही नाही.'


त्याच मुलाखतीत अमृता सिंगसोबत रिलेशनशिपच्या चर्चांविषयी प्रश्न विचारताच सनी देओल म्हणाला, चित्रपटसृष्टीत येण्याआधी लोक सेलिब्रिटींबद्दल काय लिहितात, हे सर्व मी पाहिलं आहे. हे सर्व सहन करावंच लागतं. कधी कधी उगाच वाढवून काहीही लिहिलं जातं, तेव्हा राग येतो. अशी व्यक्ती जर कधी भेटली तर त्याला मारावंसं वाटतं. अजून काय करू शकतो?'सनी आणि अमृता सिंगच्या नात्याविषयी बोलायचं झालं तर अमृताच्या आईला त्यांचं नातं मान्य नव्हतं त्यामुळे त्यांचं नात पुढे गेलं नाही असे म्हटले जात होते. 


हेही वाचा : 'अमीषा आणि मी एकत्र...', 'गदर' फेम अभिनेत्रीसोबतच्या रिलेशनशिपवर विक्रम भट्ट यांनी सोडलं मौन


दरम्यान, 'गदर 2' या चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर या चित्रपटानं बॉक्स ऑफिस चांगली कमाई करताना दिसत आहे. इतकंच नाही तर आता सगळ्यांचे लक्ष हे या सगळ्याकडे आहे की शाहरुख खानचा 'जवान' हा चित्रपट आल्यानंतर 'गदर 2' बॉक्स ऑफिसवर किती कमाई करेल