मुंबई : सध्या सोशल मीडियावर स्टारकिड्सबद्दल सतत चर्चा रंगलेली असते. काही स्टारकिड्सने तर अभिनय क्षेत्रात पदार्पण देखील केलं. त्यामधील एक म्हणजे अभिनेते धर्मेंद्र यांचा नातू करण देओल. अभिनेता सनी देओल आणि अभिनेते धर्मेंद्र यांनी त्यांचा काळ गाजवला होता. नुकताचं करण देओलला एका मुलाखतीत त्याच्या कुटुंबाबद्दल विचारण्यात आलं. यावेळी त्याने अभिनेत्री हेमा मालिनीबद्दल देखील स्वतःचं मत मांडलं. हेमा मालिनी यांचं करियर अत्यंत प्रभावशाली आहे असं करणने सांगितलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हेमा मालिनीबद्दल बोलताना करण म्हणाला, 'त्याची कारकीर्द सुरुवातीपासूनच चमकदार आहे. इंडस्ट्रीत त्याचे एक अतिशय प्रतिष्ठित नाव आहे.' त्यानंतर करणला हेमा यांचे चित्रपट पाहिले आहेत का? असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर देत करण म्हणाला, 'मी त्यांचे दोन चित्रपट पाहिले आहेत. मी पाहिलेल्या सर्व चित्रपटांनुसार त्या खरोखर प्रतिभाशाली अभिनेत्री आहेत. '



'माझे वडील सनी देओल देखील हेमा मालिनी यांचा आदार करतात. अनेक मुलाखतींमध्ये त्यांनी या गोष्टीचा खुलासा देखील केला आहे. ' असं देखील करण यावेळी म्हणाला. करण, धर्मेंद्र आणि त्यांच्या पहिल्या पत्नी प्रकाश कौर यांचा नातू आहे. तर ईशा देओल आणि अहाना देओल या दोघी धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या मुली आहेत. 


करण देओलने त्याच्या करियरची सुरूवात 2019 साली 'पल पल दिल के पास' या चित्रपटाच्या माध्यमातून केली आहे. पण करणचा पहिलाचं चित्रपट प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास अयशस्वी ठरला. तो आता लवकरचं 'अपने 2' चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात देओल कुटुंबाच्या 3 पिढ्या एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत.