मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी आणि अभिनेता अरबाज खान या जोडीच्या ‘तेरा इंतजार’ सिनेमाचं पोस्टर रिलीज करण्यात आलंय. ‘तेरा इंतजार’ हा एक रोमॅंटिक सिनेमा असून या सिनेमाचं दिग्दर्शन राजीव वालिया यानी केलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अरबाज खान आणि सनी लिओनी हे या सिनेमाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र काम करीत आहेत. दोघेही या सिनेमात रोमान्स करताना बघायला मिळणार आहे. त्यामुळे या सिनेमाची उत्सुकता आधीपासूनच लागली आहे. सनीच्या आतापर्यंत भूमिका पाहता, या सिनेमातील भूमिका वेगळी असल्याचे बोलले जात आहे. 



२४ सप्टेंबरला हा सिनेमा रिलीज होणार असून या जोडी पडद्यावर एकत्र बघण्यासाठी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. आता या सिनेमात सनीचा कोणता अंदाज बघायला मिळतो, हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.