मुंबई : बॉलिवूड सिनेमांत आपल्या हॉट आणि बोल्ड अंदाजाने सर्वांना घाय़ाळ करणारी अभिनेत्री सनी लियोनीच्या बायोपिकचा ट्रेलर रिलीज झाला आहे. सनीचे चाहते तिच्या या बायोपिकची आतुरतेने वाट पाहत होते. काही दिवसांपूर्वी सिनेमाचे मोशन पोस्टर प्रदर्शित झाले. ते चाहत्यांच्या चांगलेच पसंतीस उतरले.


ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सनीच्या या बायोपिकचे नाव ‘करनजीत कौर- द अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी लियोन’ असे आहे. प्रेक्षकांच्या पसंतीस पडलेला या सिनेमाचा ट्रेलर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा ट्रेलर ९ तासात सुमारे 4 लाख 50 हजार लोकांनी पाहिला. सनी लियोनीचा बायोपिक ही एक वेब फिल्म आहे. ही फिल्म १६ जुलैला वेब प्लेटफॉर्म ZEE5 प्रसारित होईल.


सिनेमात सनीचा हॉट अंदाज


‘करनजीत कौर- द अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी लियोन’चा ट्रेलर २ मिनिटं २४ सेकंदांचा आहे. यात सनीचे बोल्ड सीन्स आणि सेमी न्यूड सीन्स ही आहेत. यात सनीचे विविध पैलू पाहायला मिळतील. सनीचे बालपण, पॉर्न इंडस्ट्रीकडे ती कशी वळली आणि त्यानंरचा प्रवास सिनेमात दाखवण्यात आला आहे. 



आणि ती झाली ब़ॉलिवूड अभिनेत्री


बॉलिवूडमध्ये पर्दापण करण्यापूर्वी सनी एक लोकप्रिय पॉर्न स्टार होती. २०११ मध्ये बीग बॉसच्या पाचव्या सीजनमध्ये ती भारतीय टेलिव्हीजनवर पहिल्यांदाच झळकली. त्यानंतर खूप चर्चेत राहिली. तेव्हाच तिला महेश भट्टचा जिस्म २ हा सिनेमा मिळाला. त्यानंतर 'रागनी एमएमएस-2', 'एक पहेली लीला' यांसारख्या सिनेमात काम करुन तिने बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली. तिचा जीवनप्रवास आता वेब फिल्मद्वारा प्रेक्षकांसमोर येणार आहे.