कोलकाता : पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथील कॉलेजचे प्राचार्य आणि कुलगुरू या सगळ्याच लोकांचे लक्ष हे अ‍ॅडमीशन फॉर्मवर आहे, त्यासाठी ते त्यांच्या संगणकाच्या स्क्रिनवर लक्ष ठेऊन आहेत, त्यात त्यांची नजर फक्त एकच नाव शोधत आहेत, ते म्हणजे सनी लिओनी. आता तुम्ही म्हणाल की, हे सगळे लोकं सनी लिओनीचं नाव का शोधत असावे? सनी आता कॉलेजमध्ये अ‍ॅडमिशन घेतेय की काय? परंतु तसे काही नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे सगळ कॉलेजकडून केलं जातंय कारण त्यांना फसवणूक टाळायची आहे. आता तुम्ही विचार कराल की, मग या फसवणूकीचा आणि सनी लिओनीचा संबंध काय? हे सगळे लोकं तिचं नाव का शोधत असावे बरं? तर याचं उत्तर लपलंय ते कॉलेजच्या गेल्या वर्षीच्या अ‍ॅडमिशन लिस्टमध्ये.


गेल्या वर्षी ऑगस्ट 2020 मध्ये, कोलकाताच्या आशुतोष कॉलेजमध्ये इंग्रजी लिट्रेचरच्या प्रवेश परीक्षेदरम्यान एक घटना उघड झाली. या कॉलेजमध्ये कोणीतरी सनी लिओनीच्या नावाने बनावट अर्ज केला होता, आणि त्यात आश्चर्य असे की, हे नाव गुणवत्ता यादीत सर्वात वर होते.


त्यानंतर सोशल मीडियावर मीम्स आणि मनोरंजक जोक सर्वत्र फिरु लागले. त्यावेळी स्वत: सनी लिओनीनेही ट्विट करून स्वत: ला कॉलेजमध्ये पुन्हा शिकण्यासाठी उत्साहित असल्याचे सांगितले होते.


या वर्षी असा कोणताही विनोद होणार नाही, याची खात्री करण्यासाठी कॉलेज कोणतीही कसर सोडत नाहीत. गेल्या वर्षी, कॉलेज आणि विद्यापीठे ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत अडकली होती, ज्यामुळे सनी लिओनीच्या नावाने बनावट अर्ज त्यांच्या नजरेतून सुटला आणि गुणवत्ता यादीत आला. परंतु यावर्षी महाविद्यालये पूर्ण अलर्ट मोडमध्ये आहेत. अर्जाचा टप्पा आणि गुणवत्ता यादी तयार करण्यापूर्वी सर्व योग्य गोष्टींकडे लक्ष दिले जात आहेत.


आशुतोष कॉलेजच्या एका अधिकाऱ्याने सांगितले, "विद्यार्थ्यांना मार्कशीटची कॉपी, स्वाक्षरी आणि इतर कागदपत्रांची प्रत अपलोड करण्यास सांगितले जाईल. अर्ज करताना सादर केलेली कागदपत्रे जुडली जातील. जर कोणी बनावट तपशील देत असेल, तर त्याला या टप्प्यावर पकडले जाईल. गेल्या वेळेसारखी घटना घडू नये म्हणून आम्ही सर्व प्रक्रियेवर लक्ष ठेऊन आहोत.


प्रेसिडेन्सी विद्यापीठाने अर्जाच्या टप्प्यावरच सर्व कागदपत्रांची छाननी करण्याची तयारी केली आहे. येथे विद्यार्थ्यांना ऑनलाईन अहवाल देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. ऑनलाइन संवादाची अशीच प्रक्रिया रामकृष्ण मिशन विद्या मंदिर आणि सेंट झेवियर्स कॉलेजद्वारे देखील केली जात आहे. अनेक कॉलेजांनी एक टीम तयार केली आहे, तर अनेक ठिकाणी व्यावसायिक कंपनी हे काम हाताळत आहे.