बहिणीच्या लग्नात सनीने केला जबरदस्त डान्स!
बॉलिवूड अभिनेत्री सनी लियोनी आपल्या कुटुंबाशी चांगले संबंध आहेत.
नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेत्री सनी लियोनी आपल्या कुटुंबाशी चांगले संबंध आहेत. याचाच प्रत्यय देणारी एक घटना घडली आहे. सनी आपल्या बहिणीच्या लग्नसमारंभात सहभागी झाली. त्यासाठी तिने कॅनडा गाठले. याबद्दल सनी म्हणते, "लहानपणापासूनच माझे काकांशी आणि भावंड्यांशी अत्यंत जवळीक आहे. आम्ही एकत्र वेळ घालवला आहे. आता माझ्या बहिणेचे लग्न आहे आणि हा खास संभारंभाला जाण्याची संधी मी सोडू शकत नाही. मी इकडे आलेय हे माझ्या बहिणीसाठी सरप्राईज आहे आणि मला पाहून तिला होणारा आनंद बघण्यासाठी मी खूप उत्सुक आहे."
सनीचे पती डेनियल वेबर आणि मुलगी निशा मुंबईतच आहेत.
त्याचबरोबर सनी आपल्या आगामी चित्रपट 'तेरा इंतजार'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अरबाज खान दिसणार आहे. रईस चित्रपटातील 'लैला' हे गाणे गाजल्यानंतर सनी अजून एका आइटम सॉंगसोबत तयार आहे. सनीच्या ‘बार्बी गर्ल’ गाण्याचा टिझर नुकताच प्रदर्शित झाला.