मुंबई : आपला भूतकाळाला मागे टाकत सनीने हिंदी सिनेसृष्टीत पर्दापण केले आणि सुरुवातीला अनेक टिकांना सामोरे जात तिने बॉलिवूडमध्ये स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले. कामासोबतच सनी कुटुंबवत्सल असल्याचेही समजले जेव्हा तिने तीन मुलांचे मातृत्व स्वीकारले. याच दिवशी सनीच्या आयुष्यात एक चिमुरडी आली आणि सनी आई झाली.


सनीचा आनंद अजूनही तसाच


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याचा आनंद अजूनही सनीच्या मनात ताजा आहे. त्यामुळे सनीने एक भावनिक पोस्ट सोशल मीडियावर केली आहे. त्यात सनी म्हणते, वर्षभरापूर्वी आजच्याच दिवशी आमचं आयुष्य बदललं. आज त्याला वर्ष पूर्ण होत आहे. वर्षापूर्वी आम्ही तुला घरी घेऊन आलो. फक्त एकच वर्ष... पण मला असं वाटतंय की, तू खूप आधीपासूनच आमच्या आयुष्यात आहेस. तू माझ्या हृदयाचा आणि आत्म्याचा भाग आहेस. तू जगातील सर्वात सुंदर मुलगी आहेस, निशा कौर वेबर. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. 
सनीची या भावूक पोस्ट मधून तिच्यातील आई समोर येते. 



अन् सनीचे कुटुंब खऱ्या अर्थाने पूर्ण झाले


सनी लिओनी आणि तिचा पती डॅनिअल वेबर यांनी महाराष्ट्रातील लातूर येथून अवघ्या आठ महिन्यांच्या निशाला दत्तक घेतलं. निशाच्या पालकत्त्वाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर काही महिन्यांनी त्यांनी सरोगसीच्या माध्यमातून दोन जुळ्या मुलांचीही जबाबदारी घेतली. त्यानंतर खऱ्या अर्थाने माझं कुटुंब पूर्ण झालं आहे, अशी पोस्टही तिने केली होती.