मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सनी लियोनी सध्या तमिळ सिनेमा 'वीरमहादेवी'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. याशिवाय सनी लियोनी टी.व्ही.चा लोकप्रिय शो स्पिलिट्सविला ११ चे होस्टींग करत आहे. पण सनीच्या फॅन्ससाठी एक वाईट बातमी आहे. 


सनी लियोनी रुग्णालयात


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

७ जूनला सनी स्पिलिट्सविला ११ च्या शूटिंगसाठी रामनगरला पोहचली होती. मात्र तेथे गेल्यानंतर तिची प्रकृती बिघडल्याने तिला तात्काळ रुग्णालयामध्ये दाखल करावे लागले. शूटिंगदरम्यान सनीच्या भयंकर पोटात दुखू लागले. त्यानंतर तिला एका खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. तिथे तिचे अल्ट्रासाऊंट करण्यात आले. त्यानंतर प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर तिला डिस्चार्ज मिळाला. 


बॉडीगार्ड्सने जप्त केले फॅन्सचे फोन्स


या सगळ्यात एक खास गोष्ट झाली. ती म्हणजे सनीला हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर चाहत्यांनी तिचे फोटो काढण्यास सुरुवात केली. मात्र सनीच्या बॉडीगार्ड्सने त्यांचे फोन्स घेतले आणि काही वेळाने परत दिले. 
मात्र सनी लियोनीची प्रकृती बिघडल्याने शूटिंग थांबवण्यात आले. सनी हा शो रणविजय सिंगसोबत होस्ट करत आहे.