मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये सनी लिओनी वेगळ्या पद्धतीने चाहत्यांचं मनोरंजन करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये सनीने पिवळ्या रंगाचं जॅकेट परिधान केलं आहे. तिने हायवेस्ट जीन्स घातली आहे आणि तिचे केस मोकळे सोडले आहेत. व्हिडिओमध्ये सनी तिच्या चाहत्यांना बंदूक दाखवताना दिसत आहे आणि व्हिडिओच्या शेवटी सर्वांसोबत हसताना दिसत आहे. सनीचा हा मजेदार व्हिडिओ लोकांना खूप आवडला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हिडिओसोबत कॅप्शनमध्ये सनी लिओनने लिहिले, 'बॅड एफ' चाहते या व्हिडिओवर मजेदार कमेंट करून इमोजी पाठवत आहेत. सनी लिओनीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये सनी लिओन काही लोकांसोबत बंदूक घेऊन सीनचा सराव करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये सनीने पिवळ्या रंगाचे जॅकेट घातलं आहे. सनी लिओनीचा हा व्हिडिओ आतापर्यंत 6.5 लाखांपेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे. तिचा हा मजेदार व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.



सनी लिओनीने जसा कोणताही फोटो शेअर करते तसा लगेचच तिचा फोटो सोशल मीडियावर ट्रेंड होवू लागतो. चाहते तिच्या फोटोंवर वेगवेगळ्या कमेंट्स करताना दिसतात. सनी लिओनीच्या प्रोफेशनल लाईफबद्दल बोलायचं झालं तर तिने बॉलिवूड चित्रपटांमध्ये अनेक हिट आयटम साँग दिली आहेत. त्याशिवाय  'जिस्म 2', 'वन नाईट स्टँड', 'रागिनी एमएमएस 2', 'एक पहेली लीला' सारख्या चित्रपटांमध्येही काम केलं आहे. सनी लिओनीच्या चाहत्यांची संख्या कोटींमध्ये आहे. इन्स्टाग्रामवर 47.4 मिलीयन लोक तिला फॉलो करतात. सनी लिओनी तिच्या आगामी 'शेरो' चित्रपटात दिसणार आहे. हा एक साइकोलॉजिकल थ्रिलर चित्रपट आहे. सनीचा हा चित्रपट 4 भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.