मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओन आणि तिची मुलं नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असतात. पुन्हा एकदा सनी लिओन आणि तिच्या मुलांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. ज्यामध्ये ते पापाराझींना बाय-बाय करताना दिसत आहेत. सनी लिओनीच्या मुलांची ही क्युट स्टाईल सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांकडून पसंत केली जात आहे. त्यामुळेच तिचे चाहतेही यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर दिसत असलेल्या सनी लिओन आणि तिची मुले निशा, नोआ आणि आशर यांच्या व्हिडिओमध्ये ते पापाराझींना अतिशय मोहक पद्धतीने बाय करताना दिसत आहेत. सनी लिओनही कॅज्युअल ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. तिने चेहऱ्यावर निळ्या रंगाचा मास्कही लावला आहे. सनी लिओनी आपल्या मुलांनाही नव्या पद्धतीने बाय करायला शिकवत आहे. ही मुलं खूप गोंडस असल्याचं चाहते सांगत आहेत. कमेंट सेक्शनमध्ये हार्ट इमोजी शेअर करुन चाहते प्रतिक्रिया देत आहे.



महत्वाचं म्हणजे, आत्ताच काहि दिवसांपूर्वी सनी लिओन मुंबई एअरपोर्टमधून बाहेर पडताना स्पॉट झाली. ईथले व्हिडिओ देखील खूप सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. ज्यामध्ये तिची मुलं पापाराझींना पाहून नमस्ते आणि हॅपी दिवाली म्हणताना दिसत आहेत. त्यावेळी फॅन्सला तिच्या मुलांचा हा अंदाज फार आवडला होता. आणि ते सनी लिओनच्या मुलांना भरपूरच सभ्य आणि संस्कारी म्हणत आहे. तो व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता.