भोले बाबा उर्फ चमत्कारी बाबासंदर्भात नवा खुलासा, पोलीस तपासात उघड झालं धक्कादायक सत्य

Hathras Stampede : हाथरसमधील नारायण साकार बाबा उर्फ ​​भोले बाबा यांच्या सत्संगाच्या वेळी झालेल्या चेंगराचेंगरीमुळे 122 जणांचा नाहक बळी गेला. पोलिसांनी या अपघाताच्या विरोधात आयोजकांविरुद्ध सिंकदरराव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय. परवानगीपेक्षा जास्त गर्दी जमवणे, सामूहिक हत्या आदी गंभीर आरोपाखाली अनेक गुन्हाची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान सूरजपा उर्फ नारायण साकार हरी भोले बाबा उर्फ चमत्कारी बाबासंदर्भात  नवीन खुलासे होत आहेत. 

| Jul 04, 2024, 13:35 PM IST
1/11

भोले बाबा ऊर्फ सूरजपाल ऊर्फ एसपी सिंग ऊर्फ साकार विश्व हरी एवढ्या नावाने ओळखला जाणारा या बाबाची कुंडली पोलिसांकडून तपाली जातेय. 24 वर्षांपूर्वी मृत झालेल्या किशोरवयीन मुलीला जिवंत केल्याचा दावा केल्याप्रकरणी नारायण साकार हरी याला अटक झाली होती.   

2/11

हवालदार ते 'चमत्कारी बाबा' बनलेल्या सूरजपालसह सात जणांविरुद्ध 18 मार्च 2000 रोजी शहागंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि त्यासंदर्भात अटकही झाली. 24 वर्षांपूर्वी मलका चबुतरामधील अल्पवयीन मुलीला स्मशानभूमीत जिवंत करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.  

3/11

त्यावेळी पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतर एकच गोंधळ उडाला होता. पोलिसांनी बळाचा वापर करून कथित बाबाच्या अनेक अनुयायांना ताब्यात घेतलं होतं. सूरजपाल हा मूळचा बहादूर नगर, पटियाली एटामधील रहिवासी असून तो गुप्तचर विभागात हवालदार होता. 

4/11

विभागाशी संबंधित एका माजी कर्मचाऱ्याने सांगितलं की, 1990 मध्ये तो सूरजपाल सोबत एकत्र काम करत होते. त्यावेळी ते अर्जुन नगर, शहागंजमधील आयोजित सत्संगाला गेले आणि त्यानंतर त्याने नोकरी सोडली. 

5/11

स्वेच्छानिवृत्ती घेत त्याने स्वतः सत्संग सुरू केलं. मोठ्या संख्येने लोकांचा त्यांच्यावर विश्वास निर्माण व्हायला लागला होता. ते सत्संगला येण्यापूर्वी अनुयायी गर्दी करायचे.  त्यासोबत दिसणारी महिला ही 17 वर्षांची स्नेहलता एसपी सिंह यांची मेव्हणे मेवरम यांची मुलगी होती.

6/11

एसपी सिंग हे स्वतः निपुत्रिक होते. त्याने आपल्या भावाच्या मुलीला दत्तक घेतलं होतं. स्नेहलता यांचं 16 मार्च 2000 ला फतेहगढ इथे कर्करोगाने निधन झालं. त्याच दिवशी मृतदेह केदारनगर इथे आणल्यावर बाबाच्या घरी मुलीला जिवंत करण्याचा प्रयत्न करण्यात आला. 

7/11

एक किशोरवयीन मुलगी चमत्काराने जिवंत होण्याचा दावा करण्यात आला होता. हा चमत्कार बघण्यासाठी मोठी गर्दी जमली होती. याची माहिती मिळताच 18 मार्च 2000 ला पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलीस आल्यावर बाबांचे अनुयायी संतापले. त्यांनी दगडफेक करायला सुरुवात केली. पोलीस कर्मचारी जखमी झाले. पोलिसांनी भोले बाबा उर्फ ​​सूरजपाल याला लाठीमार करून अटक केलं. 

8/11

पटियाली परिसरात तंत्र-मंत्राचे जाळे झपाट्याने पसरत होते. तंत्रमंत्रामुळे या परिसरात यापूर्वी अनेक खळबळजनक गुन्हेगारी घटना घडल्या होत्या असं पोलीस तपासात समोर आले आहे. या भागात भोले बाबांचे माजी सेवकही बाबांपासून वेगळे झाले आणि त्यांनी स्वत:चा आश्रम सुरु केला. 

9/11

सिकंदराळ दुर्घटनेनंतर लोकांमध्ये अशा चर्चांना उधाण आलं होतं की, पटियाली परिसर बाबांसाठी खूप प्रसिद्ध आहे. छोट्या मंदिरात आणि मठांमध्येही अनेक बाबांकडून तंत्रसाधना केली जातंय. यापूर्वी अनेक बाबा गुन्हेगारी घटनांबाबत पोलिसांच्या तावडीत सापडले आहेत. 

10/11

2017 मध्ये सिद्धपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका बापाने आपल्या तीन महिन्यांच्या निष्पाप चिमुरडीचा एका तंत्रमंत्र बाबाच्या भरवशावर बळी दिला होता. त्याच वर्षी सिद्धपुराच्या किलौनीमध्ये एका मुलीचा बळी देण्यात आला, असही पोलिसांनी सांगितलं. 

11/11

अमनपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शाहपूरमध्ये तांत्रिक बाबाच्या नावाने नरबळीची घटनाही घडली होत्या. सुमारे 3 वर्षांपूर्वी धिलावली गावात होमगार्ड जवानाचा खून झाल्याची घटना घडली होती. हा तरूणही बाबा असल्याचं भासवून तांत्रिक विधी करायचा.