`दोन्ही बाजू सांभाळणं कठीण..`, DID Super Moms च्या मंचावर Sunny Leone नं सांगितल्या व्यथा
दाक्षिणात्य दिग्दर्शक युवानच्या नव्या हॉरर कॉमेडी चित्रपट असलेल्या `Oh My Ghost` चा टीझर नुकताच रिलीज झाला आहे.
Sunny Leone On Super Mom: दाक्षिणात्य दिग्दर्शक युवानच्या नव्या हॉरर कॉमेडी चित्रपट असलेल्या "Oh My Ghost" चा टीझर नुकताच रिलीज झाला आहे. या चित्रपटातून सनी लियोनी तामिळ फिल्म इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करत आहे. ट्रेलरमध्ये सनी लियोनी मायासेना नावाच्या राणीची भूमिका साकारत असल्याचं दिसत आहे. पण या चित्रपटात काम करताना सनी लियोनीसमोर अनेक अडचणी आल्या. प्रोफेशनल लाईफ आणि कुटुंब सांभाळताना दोरीवरची कसरत करावी लागली, असं सनी लियोनीनं सांगितलं.
'1942: अ लव्ह स्टोरी' या सिनेमातील 'कुछ ना कहो' या रोमँटिक ट्रॅकवर 'डीआयडी सुपर मॉम्स' स्पर्धक सादिकाच्या डान्स मूव्ह आणि एक्सप्रेशनमधील लवचिकता पाहून सनीला तिचे कौतुक वाटले. बाळंतपणाच्या काही महिन्यांनंतर ती स्टेजवर परफॉर्म करत असल्याचं ऐकून थक्क झाली.
सनी लियोनीनं सांगितलं की, "लहान मुलाला सांभाळणं आणि सराव कसा करता. तेही तुमच्या प्रसूतीनंतर अवघ्या काही महिन्यांनंतर... मला खूप आश्चर्य आणि उत्सुकता वाटते. अनेकांना बाळंपणानंतर कामाकडे परतण्यासाठी खूप वेळ लागतो. पण तू इतक्या लवकर कामावर परत आलीस, याचं आश्चर्य वाटतं." मी सुद्धा तीन मुलांची आई असल्याने काम आणि कर्तव्य पार पाडणं कठीण असतं, असं देखील सनीनं पुढे सांगितलं.
" काम करणारी आई बनणे कठीण आहे आणि मला तीन मुले आहेत. मी आई बनल्यानंतर, मला काम आणि माझ्या मुलांमध्येही समतोल राखावा लागला. मला माहित आहे की लहान मुलाची काळजी घेताना तालीम आणि सर्व गोष्टी करणं कठीण आहे. म्हणून तुम्ही खरोखरच एक अद्भुत आई आहात," असं सनी लियोनीनं कौतुक करत सांगितलं.