सनी लिओनीला प्रेमात मिळालाय धोका, म्हणाली `लग्नाला 2 महिने शिल्लक असताना मी त्याला...`
सनी लिओनीने 2011 साली तिचा बॉयफ्रेंड आणि प्रसिद्ध अभिनेता डॅनियल वेबरसह विवाह केला. पण त्यापूर्वी सनीचे एक लग्न मोडले होते.
Sunny Leone Talk About Ex partner : बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी ही 'बिग बॉस 5' या कार्यक्रमामुळे चर्चेत आली. सनी लिओनीने महेश भट्ट यांच्या 'जिस्म 2' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. आता सनीने सिनेसृष्टीत स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. नेहमी हसतमुख आणि आनंदी राहणारी सनी कायमच वैयक्तिक आयुष्याबद्दल कायमच विविध खुलासे करत असते. आता सनीने तिचे पहिले लग्न मोडल्याचा खुलासा केला आहे.
"तो माझी फसवणूक करत होता"
बॉलिवूडची बेबी डॉल म्हणून तिला ओळखले जाते. सनी लिओनीने 2011 साली तिचा बॉयफ्रेंड आणि प्रसिद्ध अभिनेता डॅनियल वेबरसह विवाह केला. पण आता नुकतंच दिलेल्या एका मुलाखतीत सनी लिओनीने एक मोठा खुलासा केला आहे. "मी डॅनियलला भेटण्यापूर्वी माझा एक साखरपुडा झाला होता. पण त्यावेळी मला काही तरी चुकल्यासारखे वाटत होते आणि तेव्हा खरंच काहीतरी चुकत होते. माझा पार्टनर माझी फसवणूक करत होता. मी एकदा त्याला विचारले होते की आता तुझे माझ्यावर प्रेम आहे का? आणि त्यावर त्याने नाही, माझे तुझ्यावर आता प्रेम नाही, असे म्हटले होते." असा किस्सा सनीने यावेळी सांगितला.
"त्यावेळी माझ्या लग्नाला फक्त 2 महिने शिल्लक होते. आमच्या लग्नाची संपूर्ण तयारी झाली होती. माझा ड्रेसही निश्चित झाला होता. पण त्यावेळी घडलेली ही घटना माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट घटना होती. पण देव काही ना काही जादू नक्कीच करतो आणि कोणत्या तरी देवदूताला पाठवतो. माझा पती डॅनिअल हा माझ्या आईच्या निधनावेळी माझ्यासोबत होता. माझ्या वडिलांचे जेव्हा निधन झाले, त्याही वेळी तो तिथे होता आणि तेव्हापासून आतापर्यंत त्याने कधीही माझी साथ सोडलेली नाही. तो कायम माझ्यासोबत आहे. देवाकडे तुमच्यासाठी नक्कीच एक उत्तम योजना असते आणि तुम्ही त्यासाठी पात्र असता", असा किस्सा सनी लिओनीने सांगितला.
सनी आता तीन मुलांची आई
दरम्यान सनी लिओनीने 2011 मध्ये तिचा बॉयफ्रेंड डॅनियल वेबरसह विवाह केला. या जोडप्याला एक मुलगी आणि दोन जुळी मुलं आहेत. सनी लिओनी आणि तिचा पती डॅनिअल वेबर यांनी लातूर येथील अनाथाश्रमातून निशाला दत्तक घेतले आहे. त्यावेळी निशा फक्त 21 महिन्यांची होती. यानंतर 2017 मध्ये सरोगसीच्या माध्यमातून सनी ही दोन मुलांची आई झाली. त्यापैकी एकाचं नाव अॅशर आणि दुसऱ्याचं नोआ आहे. पती डॅनिअल आणि तीन मुलं असं सनीचं कुटुंब आहे.