नवी दिल्ली : सनी लिओनीच्या फॅन्सना तिच्या प्रत्येक नव्या प्रोजेक्टबद्दल नेहमीच उत्सुकता असते. सनीने आपल्या एका प्रोजेक्टचे प्रमोशन इंस्टाग्रामद्वारे आगळ्यावेगळ्या पद्धतीने केले आहे. पण याबद्दल सविस्तर माहिती देण्यास टाळत आहे. शुक्रवारी सनीने एक व्हिडिओ अपलोड केला जो पाहून तिच्या डायहार्ट फॅन्सना धक्काच बसेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुम्ही सनी लिओनीचे जर खूप मोठे चाहते असाल तर हा व्हिडिओ पाहू नका. कारण तुमच्यासाठी हा व्हिडिओ कदाचित भयावह असेल. इंस्टाग्रामवर सनीने अपलोड केलेला व्हिडिओत तुमच्यासाठी धडकी भरवणारा असेल.



त्यात ती स्वत:च्या चेहऱ्यावरची त्वचा ती काढताना यामध्ये दिसत आहे. 
प्रोस्थेटिक किट ची मदत घेऊन सनीने या व्हिडिओद्वारे मजामस्ती केली आहे. आपल्या गालावरची त्वचा काढताना मला आनंद होतोय असे ती सांगत आहे. पण ८ लाखाहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. 
गेल्या आठवड्यात सनीने इन्स्टाग्रामवर दोन फोटो अपलोड केले होते. जे कमी वेळात खूप व्हायरल झाले आहेत.



त्या फोटोत ती आपल्या चेहऱ्यावर लेप लावत आहे. तिने एक असा फोटो शेअर केलाय ज्यात तिला ओळखणे कठीण आहे.



भले ही सनी सध्या या प्रोजेक्टबद्दल काही सांगत नसली तरी ही एक 'हॉरर प्रोजेक्ट' असेल असे दिसत आहे.
 "सध्या मी एखाद्या प्रकल्पावर काम करत आहे ज्याची माहिती अद्याप सार्वजनिक केली नाहीए'' असे सनीने याबद्दल सांगितले आहे.



मी माझ्या कॉस्मेटिक ब्रँड सुरू करणार आहे आणि मी याबद्दल खूप उत्सुक आहे. " असेही तिने सांगितले.