मुंबई : फादर्स डे निमित्त अनेक सेलिब्रेटींनी आपल्या मुलांसह फोटो शेअर करत हा दिवस साजरा केला. मात्र सनी लिओनीचा पती डॅनियल वेबरने आपली मुलगी आणि सनीसह फोटो पोस्ट केला मात्र या फोटोला लोकांनी चांगलेच ट्रोल केलेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डॅनियल वेबरने मुलगी निशा आणि सनीसह बोल्ड फोटो पोस्ट केलेत. हे फोटो मात्र सनीच्या चाहत्यांना पसंत आलेले नाहीये. अनेकांनी या फोटोवरुन सनीसह तिच्या पतीवरही जोरदार टीका केलीये. 


सनी लिओनीनेही फादर्स डेच्या निमित्ताने तीन मुलांसह फोटो पोस्ट केलेत,  The Man...the Father...the husband...the friend...the one that holds us together, given us the best life and a infinite amount of love! We love you Papa! @dirrty99 Love - Nisha, Asher Noah and me :) Happy Fathers Day.


यानंतर सनी लिओनीचा पती डॅनियल वेबरने आपल्या दोन जुळ्या मुलांसोबतचा फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलाय. सनी आणि डॅनियलने या वर्षी मार्चमध्ये दोन जुळ्या मुलांचे स्वागत केले. या दोघांचा जन्म सरोगसीद्वारे झालाय. 


याआधी सनीने निशाला दत्तक घेतले होते. त्यावेळी निशा २१ महिन्यांची होती. सनी लिओनीला आता तीन मुले आहेत. निशा, नोआ आणि अशर.