नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल्सना अनेकदा वॉर्डरोब मालफक्शनचं शिकार बनावं लागतं.. आता वॉर्डरोब मालफक्शनचा सामना अभिनेत्री सनी लिओनी (Sunny Leone)ला देखील करावा लागला आहे. सनी कायम आपले फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. अशात तिने एक नवा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. सनीने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये सनी वॉर्डरोब मालफक्शनची शिकार झाल्याचं दिसत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हिडिओमध्ये सनीने पिवळ्या रंगाचा गाऊन घातला आहे. ज्यामध्ये ती अत्यंत सुंदर दिसत आहे. पण हा गाऊन घालण्यात सनीला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला आहे. ही अडचण दूर करण्यासाठी संपूर्ण टीम प्रयत्न करत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. व्हिडिओमध्ये तिच्या गाऊनची चैन बंद होत नसल्यामुळे ती मोठ्या अडचणीत सापडली आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


सनीचा हा व्हिडिओ  ‘एमटीवी स्प्लिट्सविला’च्या सेटवरील आहे. ज्यामध्ये सनीची पूर्ण टीम तिची मदत करताना दिसत आहे. सांगायचं झालं तर बॉलिवूडमध्ये  वॉर्डरोब मालफक्शनच्या घटना अनेकवेळा समोर येत असतात. ज्यामुळे अभिनेत्रींना प्रचंड पेच सहन करावा लागतो. अशा परिस्थितीत अभिनेत्री स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करतात. 


सनी  सध्या केरळमध्ये तिच्या आगामी चित्रपटाच्या शुटींगसाठी गेली आहे. त्याचबरोबर ती काही शो देखील शूट करत आहे. सनी कायम सोशल मीडियावर फोटो व्हिडिओ पोस्ट करत चाहत्यांना तिच्या आयुष्यातील घडामोडींची माहिती देते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. शिवाय चाहत्यांच्या संपर्कात राहाण्यासाठी ती कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत असते. पण सनी लिओनीने हा व्हीडिओ तरी शेअर करायला नको होता.