सनी लिओनी मुलीपासून लपवणार नाही ‘ती’ गोष्ट
सनी लिओनी आणि कॉन्ट्रोवर्सी यांचं तसं जुनं नातं. पण कितीही कॉन्ट्रोवर्सी झाल्या तरी त्या हॅन्डल करणं तिला येत.
मुंबई : सनी लिओनी आणि कॉन्ट्रोवर्सी यांचं तसं जुनं नातं. पण कितीही कॉन्ट्रोवर्सी झाल्या तरी त्या हॅन्डल करणं तिला येत. काही महिन्यांपूर्वी सनी तिचा पती डॅनिअलने एक मुलगी दत्तक घेतल्यामुळे चर्चेत आली. तिने महाराष्ट्राच्या लातूर जिल्ह्यातून एक मुलगी दत्तक घेतली. तिचं नाव निशा कौर वेबर असं ठेवलं. दत्तक घेतलं तेव्हा निशा २१ महिन्यांची होती.
सत्य लपवणार नाही
नुकत्याच एका मुलाखतीत सनीने सांगितले की, निशाला दत्तक घेण्यात आलंय़, हे तिच्यापासून कधीही लपवलं जाणार नाही. हे गरजेचं आहे की, निशाला सांगितलं जावं तिची बायालॉजिकल आई कोण आहे आणि कुणी तिला ९ महिने पोटात वाढवलं. हे स्पष्ट आहे की, सनीला तिच्या मुलीपासून काहीही लपवायचं नाहीये.
तिच्या येण्याने आनंद
निशाला दत्तक घेण्याच्या प्रक्रियेला २ वर्ष वेळ लागला आणि तेव्हापासून सनी आणि डॅनिअल चांगले आई-वडील होण्याचा प्रयत्न करीत आहेत. सनीने सांगितलं की, तिचं आमच्या जीवनात येणं आनंददायी आहे.
तिची काळजी घेण्यासाठी भांडणं
सनी सांगते की, ती आणि डॅनिअल अॅक्टीव्ह पॅरेंट्स आहेत. आम्हीच तिची अंघोळ घालतो, तिचे कपडे बदलतो आणि तिला जेवण भरवतो. तसेच तिला जाग आली की आम्हीही जागे होतो. आम्ही दोघेही तिच्या रूममध्ये गुडमॉर्निंग बोलण्यासाठी धावतो. कधी कधी तर आधी कोण बोलणार यासाठी आमच्यात धक्का-बुक्कीही होते. आम्ही खरंच खूप आनंदी आहोत’.