मुंबई : तुम्ही किती चांगले किंवा वाईट नाचाता ? हे मोजमाप लग्नातील डांससाठी नसतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मग अभिनेत्री सनी लिओनी तरी याला कसा अपवाद ठरेल ? सनीच्या चुलत बहिणीच्या लग्नामध्ये सहभागी होण्यासाठी ती कॅनडामध्ये पोहचली आहे. 
 'मी काकांच्या आणि माझ्या चुलत बहिणीच्या अत्यंत जवळ आहे. आम्ही अनेक वर्ष एकत्र घालवली आहेत. मग तिच्या लग्नामध्ये सहभागी होण्याची संधी कशी सोडणार ? असं म्हणतं तिने आनंद व्यक्त केला आहे. 
 सनी लिओनीची ही कॅनडा भेट तिच्या परिवारासाठी सरप्राईज भेट होती. त्यामुळे त्यांच्या चेहर्‍यावरील आनंद पाहण्यासाठी उत्सुक असल्याचेही सनीने सांगितले आहे.
 



 सनी एकटीच कॅनडाला पोहचली आहे. तिचा पती डॅनिएल आणि मुलगी निशा मुंबईमध्येच आहे. 
 
 सध्या सनी लिऑनी तिचा आगामी चित्रपट 'तेरा इंतजार'या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटामध्ये तिच्यासोबत अभिनेता अरबाज खान आहे. 'लैला' या रईस चित्रपटातील हिट गाण्यानंतर अअता पुन्हा ती आयटम नंबर करणार आहे. लवकरच सनीचे 'बार्बी गर्ल' हे गाणं येणार आहे. काही दिवसांपूर्वी या गाण्याचा टीझर रसिकांच्या भेटीला आला होता.