मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओन आणि तिचे पती डेनियल वेबर यांनी काही दिवसांपूर्वीच २१ महिन्यांच्या मुलीला दत्तक घेतले.  या चांगल्या बातमीने सनी पुन्हा चर्चेत आली. तुम्हाला माहीत आहे का, सनी लिओनीची एका सिनेमाची फि किती आहे?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॉलिवूडमध्ये प्रवेश करण्यापूर्वीही पॉर्न इंडस्ट्रीत काम करायची. १९ वर्षांची असताना ती पॉर्नस्टार झाली. परदेशात तिने खूप कमाई केली. त्यानंतर ती भारतात आली. २०११ मध्ये ती बिग बॉस या शोमध्ये दाखल झाली. महेश भट्टने तिला बॉलिवूडमध्ये एन्ट्री दिली. त्यानंतर तिचे बॉलिवूडमध्ये आपले नाक केले.


सनी ३० मिनिटांच्या डान्स शोसाठी २३ लाख रुपये घेते. सुपरस्टार शाहरुख खानच्या 'रईस' या चित्रपटात तिने एका गाण्यावर जोरदार थिरकलेय. तिने या गाण्यासाठी चांगले पैसे घेतल्याची चर्चा आहे.  त्यामुळे ती एका सिनेमासाठी किती पैसे घेत असेल, तुम्हाला प्रश्न पडला आहे का? सनी एका सिनेमासाठी ४ कोटी रुपये घेते. तिच्याकडे ८७ कोटींची संपत्ती असल्याची माहिती उघड झालेय.