मुंबई : अभिनेता संजय दत्त या आगामी ‘भूमी’ सिनेमाच्या ट्रेलरनंतर आता या सिनेमातील आयटम सॉंग रिलीज करण्यात आलंय. अभिनेत्री सनी लिओनीवर हे गाणं चित्रीत करण्यात आलं असून यात सनीचा अफलातून डान्स बघायला मिळत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या उडत्या चालीच्या गाण्याचे बोलही आकर्षक आहे. ‘ट्रिपी ट्रिपी’ असे या गाण्याचे बोल आहेत.


दिग्दर्शक ओमंग कुमार यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं असून या सिनेमाच्या ट्रेलरला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. आता या सिनेमातील सनी लिओनीचं हे धमाकेदार गाणं रिलीज केल्याने प्रेक्षकांमध्ये अधिकच उत्सुकता वाढवली आहे. हे गाणं नेहा कक्कर, बेनी दयाल, ब्रिजेश शांडिल्य आणि बादशाहने गायलं आहे. तर सचिन-जिगर यांनी संगीत दिलंय.



‘भूमी’ हा सिनेमा संजय दत्तचा तुरुंगातून बाहेर आल्यावरचा पहिलाच सिनेमा आहे. बाप आणि मुलीच्या नात्यावर या सिनेमाची कथा असणार आहे. या सिनेमात संजय दत्त एका तरूण मुलीच्या पित्याची भूमिका साकारत असून मुलीची भूमिका अदिती राव हैदरी या अभिनेत्रीने केली आहे.