मुंबई : कॅनडातील पॉर्न जगतातून बॉलिवूडमध्ये स्थिरावलेली अभिनेत्री सनी लिओनीने मडम तुसाद म्युझिअमधील आपल्या पुतळ्याचं उद्घाटन केलं आहे. तसेच हा भारतातील पहिला सुगंधित पुतळा आहे. सनीचा हा पुतळा एका फनी पोजमध्ये बनवण्यात आला आहे. सनीच्या चाहत्यांनी या स्टॅचूसोबत फोटो काढण्यासाठी गर्दी केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कॅनडात जन्मलेली भारतीय - अमेरिकेतील अभिनेत्री आणि मॉडेल सनी लिओनीला अनेक सिनेमांत आणि टीव्ही शोमध्ये वेगवेगळं कॅरेक्टर साकारताना पाहिलं आहे. तिने कमी वेळात जो मान मिळवला तो अनेकांसाठी प्रेरणादायी ठरली आहे. नवी दिल्लीतील कनॉट परिसरातील रीगल थिएटरमध्ये मॅडम तुसादसमध्ये सनीचा आकर्षक स्टॅचू बनवण्यात आला आहे. याकरता 200 हून अधिक मेजरमेंट आणि फोटोंचा वापर करण्यात आला आहे. या अगोदर मुंबईत सनीसोबत एक मिटिंग देखील करण्यात आली. 



माझ्यासाठी खास क्षण - सनी 


सनी लिओनीने सांगितलं की, हा माझ्यासाठी खूप खास क्षण आहे. मी मडम तुसादची खूप आभारी आहे. सीटींग सेशन ते पुतळा होईपर्यंतचा सगळा अनुभव खूप खास होता. मी या संपूर्ण टीमची आभारी आहे. कारण त्यांची मेहनत कौतुकास्पद आहे.