मुंबई : गेल्याच महिन्यात अभिनेत्री सनी लिओनी आणि तिच्या पतीने २१ महिन्यांची मुलगी दत्तक घेतली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'निशा कौर वेबर' असं तिचं नामकरणही केल्यानंतर सनीने एक खास फोटो फेसबुकवर शेअर केला होता. यामुळे सनीसमोरील अडचणी वाढल्या आहेत.


  एका वृत्तपत्राच्या माहितीनुसार, सनीवर राष्ट्रीय बाल आयोगाने कारवाई केली आहे. सनी सोबतच मुलगी दत्तक देणार्‍या संस्थेवर जेजे अ‍ॅक्टचे उल्लंघन केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. मुलगी दत्तक घेण्यापूर्वी सनी लिओनी आणि त्या मुलीमध्ये मॅच मेकिंग म्हणजेच एक ऑनलाईन चॅट झाले होते.त्यावेळचा एक फोटो सनीने शेअर केला. प्रकरण न्यायालयात असताना अशाप्रकारे करता येत नाही. सोबतच 'कारा'नेदेखील ट्विटर फोटो अपलोड करताना काही अपमानकारक शब्दांचा वापर केला होता. 


 मुलगी दत्तक घेण्यापूर्वीच अशाप्रकारे फोटो पोस्ट करणं, तिची माहिती देण्याबाबत सनीला नोटीस देण्यात आली आहे. सनी सोबतच मुलगी दत्तक देणार्‍या केंद्रीय दत्तक ग्रहण प्राधिकरणकडेही संबंधित प्रकरणी विचारणा होणार आहे.


  सदर प्रकरणाची प्रक्रार बाल आयोगचे सदस्य विभांशू जोशी यांनी केली होती. त्यानुसार राष्ट्रीय बाल आयोगचे अध्यक्ष यशवंत जैन यांनी एक नोटीस जाहीर केली आहे. यावर ३० दिवसांमध्ये उत्तर मागवण्यात आले आहे. 
 सनीने आईएएनएसला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले आहे की,'आम्ही व्यावहारीक पालक आहोत. आमच्या मुलीच्या संगोपनासाठी आम्ही रोज एकत्र वेळ काढणार आहोत. निशाला सगळ्यात आधी 'गुड मॉर्निंग' कोण म्हणणार यामध्येही आमच्यात स्पर्धा होते, तिच्या खोलीत जाण्यासाठी धक्काबुक्की होते. पण आम्ही खरंच खूप आनंदी आहोत.'


 सनी लिओनीने महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील मुलगी दत्तक घेतली. दत्तक घेण्याची प्रक्रिया सुमारे २ वर्षांची होती अशी माहितीही सनीने दिली आहे. आम्ही अनेक अनाथालयांशी आणि प्रामुख्याने कॅथरीन होमशी आम्ही सतत संपर्कात असतो. त्यांच्यासोबत काम करतो. त्यामुळे मुलगी घेण्याचा निर्णयही दोन वर्षांपूर्वी घेतल्याची माहिती सनीने दिली आहे.