सनी लिऑनीचं ड्रीम रोलचं स्वप्न झालं साकार
असं काहीतरी आहे जे मला साकारण्याची इच्छा होती.` असे ती सांगते.
मुंबई : तामिळ सिनेसृष्टीत एन्ट्री करायला जाणारी अभिनेत्री सनी लिऑनीला योद्धाची भूमिका करायची होती. तिची ही इच्छा आगामी सिनेमा 'वीरमादेवी' तून पूर्ण होत आहे. 'या सिनेमाचा भाग होताना मी उत्साहित आहेत. योद्धा बनण्यामध्ये असं काहीतरी आहे जे मला साकारण्याची इच्छा होती.' असे ती सांगते. वी.सी. वदिवुदायानच्या 'वीरमादेवी'मध्ये सनी लिऑनी मुख्य भुमिकेत आहे. आपला हा लुक स्वत: सनीने सोशल मीडियावर शेअर केलायं. या फोटोत ती घोड्यावर बसलेली दिसत असून एखाद्या योद्ध्याप्रमाणे दिसत आहे.
चाहत्यांमध्ये उत्सूकता
हे योद्धाचे कॅरेक्टर सनी कशी निभावते याची उत्सूकता तिच्या चाहत्यांमध्ये आहे. या रोलसाठी मला खूप तयारी करावी लागली असं तिने एका मुलाखतीत सांगतिले. या सिनेमासाठी तामिळ शिकावे लागल्याचेही तिने सांगितले. भारत आणि लॉस एंजलिसमध्ये घोडेस्वारीची ट्रेनिंगही तिने घेतले होते. या सिनेमाचे व्हिज्युअल्स इफेक्ट्स बाहुबली सिनेमाप्रमाणे असणार असून यासाठी खूप खर्च केला गेलायं.
हिंदीतही सिनेमा
या सिनेमाची शूटींग तामिळ आणि तेलुगूमध्ये केली जातेयं. पण मल्याळम, कन्नड आणि हिंदीमध्येदेखील हा सिनेमा रिलीज केला जातोय. तामिळ सिनेमाच नाव 'वीरमादेवी' असून तेलुगूमध्ये याचे नाव 'वीरमहादेवी' आहे. वीसी वाडिवुड्यान या सिनेमाचे दिग्दर्शन करत आहे. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर किती धम्माल करतो हे येणाऱ्या काळात कळेलचं.