मुंबईः अभिनेत्री सनी लिओनी नेहमीच तिच्या सौंदर्यामुळे चर्चेत असते. सनी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि ती नेहमीच तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


सनी नेहमीच वेस्टर्न लूकमध्ये दिसत असली तरी यावेळी सनीने देसी लूक परिधान करून लोकांची मनं जिंकली आहेत.



सनी लिओनीने तिच्या इंस्टाग्रामवर दोन फोटो पोस्ट केले ज्यात तिने अनारकली सूट घातलेला होता. तिने जांभळ्या रंगाच्या दुपट्ट्याने तिचा सूट स्टाइल केला. सनीची ही देसी स्टाईल चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे.



तिचा भारतीय लूक अधिक खास बनवण्यासाठी, सनी लिओनीने कानात सुंदर इयररिंग्स घातले होते तर केसही करली केले होते. स्मोकी आयमेकअपसह चेहऱ्याला न्यूड मेकअप सनीच्या लुकला परफेक्ट टच देत होता.



सनी लिओनी नेहमीच तिच्या बोल्ड लूकमुळे चर्चेत असते. या प्रिंटेड मोनोकिनीत सनीची स्टाईल पाहण्यासारखी होती. तुम्हालाही परफेक्ट बीच लुक हवा असेल तर तुम्ही सनीच्या टिप्स घेऊ शकता.