कॉमेडियन कृष्णा अभिषेकच्या पत्नीचा बिकीनी लूक...स्वीमिंग पूलमध्ये करतेय मज्जा-मस्ती
प्रसिद्ध कॉमेडियन कृष्णा अभिषेकची पत्नी आणि अभिनेत्री कश्मीरा शाहने तिच्या बोल्डनेसने सर्वांचच लक्ष वेधलं आहे. आता कश्मिराचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे, जो प्रचंड व्हायरल होत आहे.
प्रसिद्ध कॉमेडियन कृष्णा अभिषेकची पत्नी आणि अभिनेत्री कश्मीरा शाह तिच्या बोल्डनेससाठी खूप प्रसिद्ध आहे. ती सोशल मीडियावर तिचे असे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करते, ज्यामुळे चाहते तिच्या बोल्डनेसचं कौतुक करताना थांबत नाही. आता कश्मिरा शाहचा एक व्हिडिओ समोर आला आहे, जो चर्चेत आहे.
व्हिडिओमध्ये काळ्या रंगाची बिकिनी घातलेली कश्मीरा शाह तलावाजवळ मित्रांसोबत मजा करताना दिसत आहे. कश्मिराने कॅमेऱ्यासमोर असे काही केले आहे, ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. कश्मिरा शाह पूलजवळ दिसत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. ती हळुहळू तलावाजवळ उभ्या असलेल्या तिच्या मित्र बख्तियार इराणीकडे जाते आणि त्याला ढकलते, ज्यामुळे तो पूलमध्ये पडतो.
बोल्डनेसच्या बाबतीत, वयाच्या 50 व्या वर्षीही ती तिच्यापेक्षा वयाने लहान असलेल्या बॉलिवूड अभिनेत्रींना टक्कर देते. तिचे इंस्टाग्राम अकाउंट बोल्ड आणि हॉट फोटोंनी भरलेले आहे, जे तिच्या चाहत्यांना खूप आवडतात.