मुंबई : महानायक, बिग बी, शहनशहा अशा अनेक नावांनी प्रसिद्ध असणाऱ्या अभिनेता अमिताभ बच्चन यांनी अनेक दशकं हिंदी कलाविश्वं गाजवलं. आतापर्यंतच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक यशस्वी चित्रपट दिले. पण, 'जंजीर' हा चित्रपट त्यांच्या कारकिर्दीत त्यांच्यासाठी मैलाचा दगड ठरला. (Amitabh bachchan)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेता सलमान खान, याच्या वडिलांनी म्हणजेच सलीम खान यांनी या चित्रपटाची पटकथा लिहिली होती. याच चित्रपटाशी आणि बच्चन यांच्याशी निगडीत एक किस्सा सलीम खान यांनी सांगितला. 


अमिताभ बच्चन यांच्या यशाचं श्रेय तसं अनेकांनाच जातं. ते हे श्रेय घेतातसुद्धा. पण, मी कधी ही गोष्ट बोललो नाही. पण, अमिताभ बच्चन यांना पाहताच मी सांगितलं होतं, 'हा स्टार मटेरियल आहे.' असं खान म्हणाले. 


'अमिताभ बच्चन यांना एका तरी चित्रपटामध्ये घ्यायचं असा निर्धार मी केला होता. पुढे जाऊन  असं झालं की बच्चन यांना 'जंजीर' हा चित्रपट ऑफर करण्यात आला. मी त्याचं श्रेयही घेतलं नाही. पण मी जेव्हा हा चित्रपट लिहिला तेव्हा जावेद यांच्यासोबत कामही करत नव्हतो. 


खूप नंतर आम्ही एकत्र काम करण्यास सुरुवात केली, चित्रपट लिहिण्यास सुरुवात केली. यानंतर 'दीवार' आणि 'शोले' यांसारखे चित्रपटही त्यांना मिळाले'. असं सलीम खान म्हणाले. 


सलीम खान यांनी सांगितल्यानुसार 'दीवार चित्रपटाच्या वेळी निर्माते गुलशन राय यांना राजेश खन्ना यांना घ्यायचं होतं. पण, त्यासाठी राजेश खन्ना यांच्याऐवती अमिताभ चित्रपटासाठी योग्य आहेत असं मला वाटत होतं. 


अखेर यावरुन पैजही लागली. ज्यानंतर राजेश खन्ना यांच्याऐवजी चित्रपटासाठी अमिताभ बच्चन यांची निवड करण्यात आली.' बिग बींच्या यशामध्ये सलीम यांची ही भूमिका खरंच महत्त्वाची होती हे नाकारता येत नाही.