लंडन : ग्लॅमरच्या जगात राहणारे सेलेब्रिटी सहसा खूप वेगळ्या प्रकारची स्टायलिंग करतात, ज्यामुळे त्यांच्या ड्रेसपासून ते त्यांच्या हेअर स्टाईल आणि मेकपपर्यंत सगळ वेगळं असतं, ते इतक्या वेगळ्या प्रकारची ड्रेसिंग किंवा स्टाइल करुन येतात की, तशी स्टाईल आपण आपल्या नेहमीच्या आयुष्यात कोणी केली नसेल किंवा तसा करण्याचा विचार देखील करणार नाही. या सेलेब्रिटिंचे असे असामान्य ड्रेस लोकांचे लक्ष वेधून घेतातच, त्याच बरोबर ते त्यांच्या या अशा विचित्र प्रकारच्या गोष्टीमुळे चर्चेचा विषय बनतात, तर काही लोकं ट्रोल देखील होतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यात जर एखादी अभिनेत्री पूर्णपणे ट्रांसपरंट कपडे घालून एखाद्या मोठ्या कार्यक्रमात पोहोचली तर? असं केल्यास लोकांना धक्काच बसेल आणि लोकं त्या व्यक्तिला ट्रोल करु लागतील.


असेच काहीसे हॉलिवूडमधील एका अभिनेत्रीने करुन लोकांना मोठा धक्का दिला आहे. जेव्हा हॉलीवूडची सुपरस्टार मेगन फॉक्स (Megan Fox) पूर्णपणे ट्रांसपरंट ड्रेस घालून MTV VMAs 2021 मध्ये पोहोचली, तेव्हा सगळेच तिला पाहून आश्चर्यचकित झाले.


या प्रोग्रामदरम्यान मेगन फॉक्स (Megan Fox)ने या पोशाखात कॅट वॉक केलं, तेव्हा सगळ्यांच्या नजरा तिच्या वरतीच टिकून होत्या. मेगन फॉक्सने घातलेल्या ड्रेस मध्ये, तिचे आतील कपडे म्हणजेच तिचे अंडरगार्मेंट्स देखील स्पष्ट दिसत होते.


मेगन फॉक्स तिच्या बॉयफ्रेंड मशीन गन केलीसह या कार्यक्रमात पोहोचली. या पोशाखात, मेगन फॉक्सने न्यूड रंगाची ब्रा घातली होती, जे लोकांचे लक्ष वेधून घेत होते. मेगन फॉक्स खुल्या केसांमध्ये ती किलर दिसत होती आणि तिची ही बोल्ड स्टाईल लोकांना खूप आवडली होती. तर काही लोकांनी तिला ट्रोल देखील केलं.



अशी चाहत्यांची प्रतिक्रिया


मेगन फॉक्स आणि केली यांचे रेड कार्पेटवरील फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. लोक त्याच्या लूकचे कौतुक करत आहेत, तर काही लोकं त्याला ट्रोलही करत आहेत. चाहत्यांना मेगन फॉक्स आणि केली या दोघांची शैली खूप आवडते. मेगन फॉक्स अनेक सुपरहिट चित्रपटांचा एक भाग आहे आणि तिचा 'बिग गोल्ड ब्रिक' हा चित्रपट येत्या काळात प्रदर्शित होणार आहे.