‘पद्मावती’च्या बंदीची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली
`पद्मावती` सिनेमावरील बंदीची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. त्यामुळे आता हा सिनेमा रिलीज होणार का? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
नवी दिल्ली : 'पद्मावती' सिनेमावरील बंदीची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. वकील मनोहरलाल शर्मा यांनी या सिनेमावर बंदी आणावी अशी मागणी करणारी याचिका सुप्री कोर्टात दाखल केली होती. त्यामुळे आता हा सिनेमा रिलीज होणार का? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
पद्मावती सिनेमाचा वाद
गेल्या काही दिवसांपासून राजपूत आणि करणी सेनेकडून पद्मावती सिनेमाला विरोध होतोय. काही झालं तरी पद्मावती सिनेमा रिलीज होऊ देणार नाही, अशी भूमिका या संघटनांनी घेतलीय. या विरोधाच्या पार्श्वभूमीवर सेन्सॉरनंही तांत्रिक कारण देत सिनेमाला प्रमाणपत्र देण्यास नकार दिलाय. त्यामुळे सिनेमाचं रिलीज लांबणीवर पडलंय.
सुप्रीम कोर्टात याचिका
याच पार्श्वभूमीवर सिनेमावर बंदी घालण्यात यावी अशी मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती. मात्र कोर्टानं ही याचिका फेटाळलीय. तसंच सिनेमाला विरोध करणा-यांनाही सुप्रीम कोर्टानं फटकारलंय. ज्या सिनेमाला सेन्सॉरनं प्रमाणपत्र दिलेले नाही त्यावरुन एका पदावर असणा-या व्यक्तींनी वादग्रस्त विधानं करु नयेत अशा शब्दांत कोर्टानं फटकारलंय.