Supriya Pathare Son Maharaj Hotel Closed : सुप्रिया पाठारेंच्या मुलाच्या हॉटेलची सध्या जोरात चर्चा आहे. काही दिवसांपुर्वी त्यांच्या मुलाचे महाराज हॉटेल हे सुरू नव्हते. त्यामुळे हे हॉटेल बंद झालं की काय अशी बरीच चर्चा होती. परंतु त्यावर सुप्रिया पाठारे यांनी स्पष्टीकरण देणारा व्हिडीओ शेअर केला होता. ज्यात त्यांनी म्हटलं होतं की त्यांच्या आईचं निधन झाल्यामुळे त्यांनी काही काळापुरतं हे हॉटेल बंद ठेवण्यात आले होते. पण काही काळ बंद राहिल्यानंतर हे हॉटेल पुन्हा सुरू झाले आहे. येत्या नोव्हेंबर महिन्यापासूनच हे हॉटेल सुरू झाले होते. परंतु आता परत हॉटेल बंद झाल्याचा व्हिडीओ सुप्रिया पाठारे यांनी पोस्ट केला आहे. त्यामुळे परत त्याच्या मुलाचे हॉटेल हे काही काळासाठी बंद राहणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी सुप्रिया पाठारे यांनी महाराज हॉटेलमधील पावभाजीची चव चाखत एक हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. यावेळी त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे की, ''काही अडचणी मुळे महाराज आपलं बंद आहे,लवकरच खवयेसाठी हजर होऊ,स्वामी चरणी हीच प्रार्थना, भेटूया लवकरच''.


सध्या त्यांच्या या व्हिडीओखाली नानाविध कमेंट्स येताना दिसत आहेत. त्यामुळे चाहत्यांसाठी सध्या महाराज हॉटेल सेवेत नसणार आहे यावरून दिसते आहे. सुप्रिया पाठारे यांच्या मुलाच्या महाराज या हॉटेलची बरीच चर्चा असते. त्यामुळे त्याची जोरात चर्चा असते. सुप्रिया पाठारेही त्याच्या या हॉटेलचे व्हिडीओ हे पोस्ट करताना दिसतात. त्याचसोबत अनेक मराठी सेलिब्रेटी देखील या हॉटेलला भेट देताना दिसतात. 


हेही वाचा : आईचं स्वप्न अन् भावानं दिलं बळ; स्वत:चा पेट्रोल पंप सुरू केल्यानंतर आदर्श शिंदे यांची भावूक पोस्ट


काही दिवसांपुर्वीच मिहीर पाठारेचे हॉटेल हे बंद होते. महाराज हॉटेल येथे स्पेशल पावभाजी मिळते. हे हॉटेल ठाण्यात सुरू आहे. या हॉटेलला ग्राहक भेट देताना दिसतात. येथील पावभाजी ही तुम्हीही ट्राय करायला हवी. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


सुप्रिया पाठारे या लोकप्रिय अभिनेत्री आहेत. त्यांची फू बाई फू ही मालिका प्रचंड गाजली होती. त्यातून त्या नुकत्याच ठिपक्यांची रांगोळी या मालिकेतून दिसल्या होत्या. या मालिकेनं नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. मिहीर पाठारे हा प्रोफेशनल शेफ असून तो ठाण्यात आपलं फूड ट्रक चालवतो. त्याच्या या महाराज हॉटेलची बरीच चर्चा आहे. आता हे हॉटेल काही काळासाठी बंद राहणार आहे.