मुंबई : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी कपूर भगिनींबरोबर एक फोटो शेअर केला आहे. विथ लव्हली के गर्ल्स - करिष्मा अँड करिना असं कॅप्शन देऊन सुप्रियांनी हा फोटो ट्व्टिरवर शेअर केलाय. कपूर यांच्या एका कौटुंबिक कार्यक्रमात ही भेट झाली.


तर दुसरीकडे करिनाचा विमानतळाववरच मेकअप


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॉलिवूडची बेबो सध्या आगामी सिनेमा गुड न्यूजच्या प्रमोशनसाठी व्यग्र आहे. मात्र ती तैमुर आणि कुटुंबालाही तितकाच वेळ देतेयं. नुकतीच ती बंगळुरू येथे एका स्टोअरच्या उद्घाटनाला गेली होती. 


या दरम्यानचा तिचा विमानतळावरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यात ती चक्क विमानतळावर बसूनच मेकअप करताना दिसत आहे. 



चुलत भाऊ अरमान जैनच्या रोका सेरेमनीला जाण्यासाठी वेळ वाचावा म्हणून तिने चक्क विमानतळावर बसून मेकअप करायला सुरुवात केली. तर करिना लाल रंगाच्या चुडीदार ड्रेसमध्ये हातात आरसा घेऊन स्वतःला पाहताना दिसतेय.