मुंबई : जयंत लाडे प्रस्तुत 'सूर सपाटा' सिनेमाचं पहिलं वहिलं गाणं चाहत्यांच्या भेटीला आलं आहे. गाण्यामध्ये लहानपणी उधळलेले मैत्रीचे रंग तसेच पावसात केलेली मज्जा आणि उद्याची पर्वा न करता जगलेला आजचा क्षण अत्यंत ह्दयस्पर्शी आहे. प्रसिद्ध गायक आदर्श शिंदे आणि प्रियंका बर्वे यांनी हे गाणं गायलं असून 'रंग भारी रे' असे गाण्याचे बोल आहेत. सूर सपाटा, मार रपाटा, ह्याच गड्याचा काढीन काटा..अशी टॅग लाइन असलेला हा सिनेमा कब्बडी या मैदानी खेळावर आधारलेला आहे. कब्बडी खेळावर बेतलेला हा पहिलाच मराठी सिनेमा आहे. 22 मार्च 2019 रोजी सिनेमा सिनेमाघरात दाखल होणार. सिनेमाचे दिग्दर्शन मंगेश कंथाळे यांनी केले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


 


शाळेतील सामान्य विद्यार्थ्यांमध्ये  असलेली असामान्य कला आणि त्यांचे कौशल्य पाहून त्यांना स्पर्धेमध्ये उतरवू पाहणारे शिक्षक आणि विद्यार्थांमध्ये असलेली खेळाविषयी चिकाटी अशा सर्व सिनेमातील गोष्टी प्रभावित करणाऱ्या आहेत. कब्बडी खेळताना खेळाडूंनी कशा प्रकारे समोर आलेल्या अडचींवर मात करत आपले ध्येय साध्य केले याचा प्रत्यय प्रेक्षकांना सिनेमाच्या माध्यमातून अनूभवता येणार आहे. 


सिनेमात राष्ट्रीय पुरस्कार विजेता बाल कलाकार हंसराज जगताप, यश कुलकर्णी, चिन्मय संत हे बाल कलाकार सिनेमात मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.