मुंबई : रिएलिटी शोकडे अनेक सेलिब्रिटी एक नवी संधी म्हणून पाहतात. हिंदी टेलिव्हिजनवरील 'नागीण' म्हणजेच सुरभी ज्योतीलादेखील भविष्यात रिएलिटी शोचा भाग होण्याची इच्छा आहे. लवकरच 'नागीण 3' या मालिकेत  सुरभी झळकणार आहे. या मालिकेत सुरभी शेतकर्‍याच्या मुलीची भूमिका साकारणार आहे. तिच्या भूमिकेच नाव 'बेला' आहे. 


कोणता शो करणार ? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 



सुरभी ज्योतीला रिएलिटी शोचा भाग होण्याची इच्छा आहे. असे तिने एका मुलाखतीमध्ये बोलून दाखवले आहे. बिग बॉसपेक्षा खतरों के खिलाडी किंवा झलक दिलखा जा अशा शोमध्ये सहभागी होण्याची तिने व्यक्त केली आहे. सुरभीच्या फॅन्सला तिला खतरों के खिलाडी किंवा एखाद्या ग्लॅमरस रूपामध्ये पहायचं आहे. सुरभीची सुरूवात 'कबुल है' या शोपासून झाली. काही दिवसांपूर्वी 'कोई लौट आया है' या मालिकेत ती झळकली होती. बरून सोबत बरोबर ती 'तन्हाईया' ही वेबसीरिजदेखील करत आहे.