मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री जरीन खाननंतर अजून एका अभिनेत्रीने कास्टिंग काऊचचा खुलासा केला आहे. छोट्या आणि मोठ्या पडद्यावर काम केलेल्या या अभिनेत्रीला प्रेक्षकांनी कायमच पसंत केलं आहे. अभिनेत्रीने मोठा खुलासा केला आहे की, एक वेळा नाही तर तब्बल पाच वेळा कास्टिंग काऊचची शिकार झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेत्री सुरवीन चावला हीने मोठा खुलासा केला आहे. सुरवीनने नुकतीच एका वेबसाइटला मुलाखत दिली आहे. यामध्ये तिने आपल्या खासगी आयुष्याबरोबरच मनोरंजन क्षेत्रातील चांगल्या, वाईट गोष्टींचा खुलासा केला आहे. यामध्ये ती म्हणाली की, पाच वेळा ती कास्टिंग काऊचची शिकार झाली आहे. दिग्दर्शकाने तिच्या शरीरावर घाणेरडी प्रतिक्रिया दिली असून त्याने तिचा क्लीवेज लूक पाहण्याची मागणी केली आहे. 



सुरवीन चावलाने दुसऱ्या एका दिग्दर्शकाबद्दल बोलताना सांगितले की, साऊथच्या एका दिग्दर्शकाने माझ्या शरिराचा एक एक इंच पाहण्याची मागणी केली होती. हे ऐकल्यावर मला माझ्या कानांवर विश्वासच होत नव्हती. तसेच सुरवीनला आपल्या वजनामुळे देखील अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागले. एका ठिकाणी ऑडिशनला गेल्यावर तेथे माझं वजन जास्त असल्याचं सांगितलं. पण खरं म्हणजे तेव्हा माझं वजन फक्त 56 किलो होते. 



सुरवीन चावलाने 'हेट स्टोरी 2' सिनेमात मुख्य भूमिका साकारली आहे. या सिनेमाच्या प्रदर्शनानंतर सुरवीन डिप्रेशनमध्ये गेली होती. काही गोष्टींचा मी जसा विचार केला होता तशा त्या घडल्या नाहीत. मी हा विचार करून आनंदी होती की, मी सिनेमात काम केलं आहे.



15 एप्रिल 2019 मध्ये सुरवीनने ईवा नावाच्या गोंडस मुलीला जन्म दिला आहे. 7 सप्टेंबर रोजी तिने ईवाचा एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर अपलोड केलं आहे. कामाबद्दल बोलायचं झालं तर सुरवीन 'सेक्रेड गेम्स 2' मध्ये दिसली.