मुंबई : आज बॉक्स ऑफिसवर दोन हिंदी, तीन मराठी तर एक हॉलिवूडचा  सिनेमा प्रदर्शित झालाये. हिंदीमध्ये सुशांत सिंग राजपूत आणि क्रिती सॅनन स्टारर राबता हा सिनेमा प्रदर्शित झालाये. हा सिनेमा सुशांत आणि क्रितीच्या सिंझलिंग केमिस्ट्रीमुळे हा सिनेमा चांगलाच चर्चेत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुसरीकडे राजकुमार राव आणि श्रुती हसन यांची प्रमुख भूमिका असलेला बहन होगी तेरी हा रोमॅण्टिक कॉमेडी सिनेमाही प्रदर्शित झालाये. टॉम क्रूझची प्रमुख भूमिका असलेला 'द ममी' सिरीजचा पाचवा भागही आज प्रदर्शित झालाये.


सिनेमातील थरारक स्टंट्स सगळ्यांनाच भावले असून या सिनेमाला पसंतीची पावती मिळालीये. तर मराठीत झारी, आयटम गिरी आणि धोंडी हे तीन सिनेमे प्रदर्शित झाले आहेत..त्यामुळे यापैकी आता कोणता सिनेमा बॉक्स ऑफिसवर बाजी मारतो याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.