मुंबई : सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) ने जगाचा निरोप घेतला आहे. दोन वर्षे लोटली तरी चाहते आजही सुशांतच्या आठवणीत रमताना दिसत आहेत. अनेकदा सोशल मीडियावर सुशांतचं नाव ट्रेंड होताना दिसतं. सुशांतने आपल्या चाहत्यांच्या मनात खास जागा निर्माण केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्या सगळ्यांना माहितच आहे, सुशांत अंतराळावर विशेष प्रेम होतं. त्याच्या त्या विशेष प्रेमामुळे त्याच आंतरराष्ट्रीय स्तरावरूनही कौतुक होत आहे. 



सुशांत सिंह राजपूतला चंद्राबद्दल विशेष प्रेम होतं. अनेकदा त्याने सोशल मीडियावर याबद्दलचे पोस्ट शेअर केले होते. एवढंच काय चंद्र आणि तारे पाहण्याकरता त्याच्याकडे खास दुर्बिण देखील होती. 


त्याचा हा आनंद पाहून अमेरिकन लूनर सोसायटीने सुशांतचा वाढदिवस 'सुशांत मून' (Sushant Moon) नावाने साजरा करण्याचा निर्णय घेताल आहे. 



अमेरिकन लूनर सोसायटीने याबाबत ऑफिशिअल वेबसाइटवर अधिकृत घोषणा केली आहे. २१ जानेवारी २०२३ हा दिवस 'सुशांत मून' Sushant Moon नावाने साजरा होणार आहे. 



चंद्रावर सुशांतने खरेदी केली जमीन अमेरिकन लूनर सोसायटीने सांगितलं की, आम्हाला आशआ आहे की, सुशांत मून हा एक ऐतिहासिक कार्यक्रम होईल. हे महत्वाचं नाही की, सुशांतचा वाढदिवस अमावस्येच्याच दिवशी असेल.


मिळालेल्या माहितीनुसार, ५.३ मिलियन ट्विट्स त्यांच्या चाहत्यांकडून सुशांतसाठी केले आहेत. #SushantDay हा हॅशटॅग ट्रेंड होता. सुशांत सिंह राजपूत एक असा अभिनेता आहे. ज्याची चंद्रावर जमिन आहे. ज्याने चंद्रावर Mare Moscoviense च्या Sea of Muscovy वर जमिन खरेदी केली आहे.


'चंदा मामा दूर के' सिनेमात करणार होता काम 


सुशांतने त्याच्या इंस्टाग्रामवर त्याच्या मालमत्तेचा फोटोही शेअर केला आहे. त्याने 'चंदा मामा दूर के' हा चित्रपटही साइन केला होता, ज्यामध्ये तो एका अंतराळवीराच्या भूमिकेत दिसणार होता.


या चित्रपटाच्या तयारीसाठी सुशांत सिंग राजपूतही नासामध्ये गेला होता. मात्र, त्यांच्या निधनानंतर चित्रपटाला अद्याप सुरुवात झालेली नाही.


१४ जून २०२० साली मुंबईतील राहत्या घरी सुशांत सिंह राजपूत मृतावस्थेत आढळला.