Sushant Singh Rajput Birth Anniversary: ​​आज दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतचा (Sushant Singh Rajput) वाढदिवस आहे. सुशांतनं 2020 साली मुंबईतील वांद्रे येथे राहणाऱ्या त्याच्या घरी गळफास घेत आत्महत्या केली होती. आज त्याला जाऊन जवळपास अडीच वर्ष उलटलं तरी देखील तो सगळ्यांच्या आठवणीत जिवंत आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्तानं बहीण श्वेता सिंग कीर्तीनं (Shweta Singh Kirti) सोशल मीडियावर काही Unseen फोटो शेअर करत एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. सुशांतचा आज 37 वा वाढदिवस असता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्वेता सिंग कीर्तीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये सुशांतचा तिच्या मुलांसोबत न पाहिलेलाल एक फोटो तिनं शेअर केला आहे. या फोटोमध्ये श्वेताची लेक ही सुशांतच्या गालावर किस करताना दिसत आहे. या फोटोत सुशांतचा भाचा देखील दिसत आहे. 



हा थ्रोबॅक फोटो शेअर करत, श्वेतानं एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. "माझ्या गोंडस आणि छोट्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा... तू जिथे असशील तिथे आनंदी रहा (मला वाटतं की तू शिवजींसोबत कैलासमध्ये फिरत असशील) मी तुला खूप खूप शुभेच्छा देते. कधी कधी तू खाली पाहायला पाहिजे की तू काय जादू केली आहेस. तुझ्यासारख्या गोल्डन हार्ट असलेल्या अनेक सुशांतला तू जन्म दिला आहेस. माझं बाळ, मला तुझ्यावर गर्व आहे." असे कॅप्शन श्वेतानं दिलं आहे. 


हेही वाचा : Raveena Tandon ची कन्या Ajay Devgn सोबत दिसणार! अभिषेक करणार लॉन्च


सुशांतसिंग राजपूतची आत्महत्या नसून त्याची हत्या झाल्याचा दावा मुंबईतल्या कूपर रुग्णालयातल्या ( Cooper Hospital, Mumbai) शवागृहातील कर्मचारी रुपकुमार शहा ( Roopkumar Shah) यांनी केलाय. रुपकुमार शाह 13 ते 14 जून 2020 ला कूपर रुग्णालयातल्या शवागृहातच काम (Mortuary Servant) करत होते. अभिनेता सुशांतचा मृतदेह आला तेव्हा त्याच्या शरीरावर जखमा आणि मुका मार होता असा दावा त्यांनी केलाय. याबद्दल डॉक्टरांना सांगूनही त्यांनी लक्ष दिलं नाही असा दावा त्यांनी केलाय. 


सुशात सिंगने घेताल जगाचा निरोप


अभिनेता सुशांत सिंग राजपूतने वयाच्या अवघ्या 34 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. त्याच्या पाच दिवस आधीच सुशांतची माजी मॅनेजर दिशा सालयिन हिने मालाज इथल्या इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केली होती. याप्रकरणाचाही अद्याप तपास सुरुच आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्र सिंग धोणीच्या जीवनावरील चित्रपटातून सुशांतने बॉलिवूडमध्ये आपली वेगळी छाप उमटवली होती. त्यानंतर छिछोरे या चित्रपटातील कामाचीही चांगलीच चर्चा झाली. करिअरच्या शिखरावर असताना सुशांत सिंगने उचललेल्या टोकाच्या पावलामुळे सर्वांनाच धक्का बसला.