Zee TV च्या `या` मालिकेमुळे सुशांत सिंह झाला होता लोकप्रिय
या मालिकेतील सुशांतची `मानव` ही व्यक्तिरेखा प्रचंड लोकप्रिय ठरली.
मुंबई: 'एम.एस. धोनी- द अनटोल्ड स्टोरी' फेम अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येच्या बातमीने कलाविश्वात मोठी खळबळ उडाली आहे. वांद्रे येथील राहत्या घरी त्याने गळफास लावून आत्महत्या केल्याचे समजते.
सुशांत सिंह राजपूतने छोट्या पडद्यावरुन आपल्या अभिनयाच्या कारकीर्दीला सुरुवात केली होती. 'किस देश में है मेरा दिल' या मालिकेतून त्याने टेलिव्हिजन विश्वात पदार्पण केले. मात्र, Zee TV वरील एकता कपूर दिग्दर्शित 'पवित्र रिश्ता' या मालिकेने सुशांतला घराघरात पोहोचवले. या मालिकेतील सुशांतची 'मानव' ही व्यक्तिरेखा प्रचंड लोकप्रिय ठरली.
सुशांत सिंह राजपूतची शेवटची इन्स्टा पोस्ट
यानंतर सुशांतला 'काय पो छे' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये ब्रेक मिळाला. या चित्रपटातील अभिनयाने त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. 'काय पो छे' नंतर सुशांतने 'शुद्ध देसी रोमान्स' हा चित्रपट केला. तर क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीचा बायोपिक M.S. Dhoni: The Untold Story हा त्याचा सर्वात लोकप्रिय चित्रपट ठरला. यामध्ये त्याने आपल्या संयत अभिनयाने धोनीची व्यक्तिरेखा पडद्यावर जिवंत केली. तर 'छिछोरे' हा सुशात सिंह राजपूतचा शेवटचा चित्रपट ठरला.
एक्स मॅनेजरच्या आत्महत्येनंतर ५ दिवसांनी सुशांत सिंह राजपूतने केली आत्महत्या
सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येच्या बातमीने कलाविश्वाला मोठा धक्का बसला आहे. प्राथमिक माहितीनुसार, सुशांतने नैराश्याच्या भरात आत्महत्या केल्याचे समजते. मात्र, याला पोलिसांनी अधिकृत दुजारो दिलेला नाही. त्यामुळे सुशांतने एवढ्या टोकाचा निर्णय का घेतला, याची प्रचंड चर्चा रंगली आहे. काही दिवसांपूर्वीच सुशांतची एक्स मॅनेजर दिशा सलियन हिनेदेखील इमारतीवरुन उडी मारून आपले जीवन संपवले होते.