सुशांत सिंह राजपूतची शेवटची इन्स्टा पोस्ट

सुशांत सिंह राजपूतची राहत्या घरात आत्महत्या

Updated: Jun 14, 2020, 03:22 PM IST
सुशांत सिंह राजपूतची शेवटची इन्स्टा पोस्ट title=

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत आता या जगात नाहीये. त्याने फांसी घेत आत्महत्या केल्याचं समोर येत आहे. त्यांच्या घरात काम करणाऱ्या व्यक्तीने पोलिसांना याची माहिती दिली आहे. सुशांतने आत्महत्या का केली याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. मुंबई पोलीस सुशांतच्या घरी पोहोचले असून अधिक तपास करत आहेत.

सुशांतने 'केदारनाथ', 'एम एस धोनी' आणि छिछोरे सारख्या अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. 'पवित्र रिश्ता' या मालिकेतून तो घराघरात पोहोचला. काही दिवसांपूर्वी सुशांतच्या मॅनेजरने देखील आत्महत्या केल्याचं समोर आलं होतं. 

३ जूनला सुशांत सिंह राजपूतने शेवटची इन्स्टा पोस्ट टाकली होती. ज्यामध्ये त्याने आपल्या आईसोबतचा फोटो शेअर केला होता. त्यामध्ये त्याने म्हटलं होतं की, 'अश्रृंच्या वाफेतून निघणारे धुसर भूतकाळ, हस्याचा आकार असणारी, ना संपणारी स्वप्न आणि छोटेसे जीवन या दोघांमध्ये सौदा आहे.'