Sushant Singh Rajput : `मृत्यूनंतरही सुशांत माझ्याशी बोलतो, त्याचा आत्मा...`, बहिण श्वेताचा खळबळजनक दावा!
Shweta Singh Kirti On Sushant Singh Rajput : सुशांतची बहीण श्वेता सिंग कीर्ती हिने सुशांतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. तर तिने एका पॉडकास्टमध्ये धक्कादायक वक्तव्य केलं आहे.
Sushant Singh Rajput death Case : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत (Sushant Singh Rajput) याने चार वर्षांपूर्वी म्हणजेच 14 जून 2020 रोजी जगाचा निरोप घेतला. राहत्या घरी त्याने स्वत:ला संपवल्याने अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले होते. तब्बल एक वर्ष या प्रकरणाची जोरदार चर्चा होती. मात्र, आता चार वर्षानंतर देखील अनेकांच्या मनात सुशांतची आठवण कायम आहे. अचानक सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटूंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला होता. अशातच आता सुशांतची बहीण श्वेता सिंग कीर्ती (Shweta Singh Kirti) हिने सुशांतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. तर तिने एका पॉडकास्टमध्ये धक्कादायक वक्तव्य केलं आहे. त्यामुळे आता मनोरंजन क्षेत्रात खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय.
काय म्हणाली Shweta Singh Kirti?
सुशांतच्या मृत्यूनंतर सुमारे दीड वर्षांनी असं काहीतरी घडलं ज्यामुळे आम्हाला भाऊ आमच्यासोबत आहे असं वाटू लागलंय. जर आपल्याला कोणी सोडून गेलं, तर आपल्याला त्याचीच सतत आठवण येते. अशा परिस्थितीत जर आपण ध्यान केलं तर ते आपल्या स्वप्नात येतात. एकदा असं झालं की, माझे एअरपॉड्स कुठं तरी हरवले होते. मी खुप शोधले परंतू मला ते सापडलेच नाहीत. त्यामुळे मी काहीकाळ काळजीत पडले होते. तेव्हा माझ्या कानात माझ्या भावाचा आवाज आला. खिडकीत पडद्याच्या मागे बघ... तेव्हा मी जाऊन बघितलं तर मला धक्काच बसला. माझे एअरपॉड्स तिथे होते. मला भीती वाटली. तेव्हा मी विचारलं, भाई हे खूप भीतीदायक तर नाही? तेव्हा मला तो म्हणाला... मी नक्कीच तुमच्यासोबत शरिरीक रुपात नाही. पण मी तुमच्यासोबत राहु शकतो, तुमच्यासोबत बोलू शकतो, असं धक्कादायक अनुभव श्वेता सिंहने सांगितला.
जेव्हा मी गाडीमधून कुठेतरी फिरायला जाते, तेव्हा त्याच्या सिनेमातील गाणी लागतात. जेव्हा मी आरती आणि भजन करते तेव्हा अचानक त्याच्या 'केदारनाथ' चित्रपटातील शिवजीचं गाणं टीव्हीवर वाजू लागतं. अशा अनेक कथा आहेत आणि आजपर्यंत सुशांत आणि मी एकमेकांशी जोडलेले आहोत, असं म्हणत श्वेताने खळबळ उडवली आहे.
जेव्हा सुशांतचा मृत्यू झाला तेव्हा मला वाटलं की माझ्या भावाचा आत्मा वर्षभर अस्वस्थ आहे, परंतु ध्यान करताना मला स्वप्नात दिसलं की आता माझा भाऊ कैलास पर्वतावर भगवान शंकरसोबत आहे आणि तो आनंदी आहे, असं श्वेता म्हणते. सुशांत आता कैलास पर्वतावर भगवान शंकरांसोबत आहे. तिथून तो सगळ्यांना पाहतोय, असंही ती म्हणते.
दरम्यान, तुम्हाला माहिती नसेल तर, सुशांत सिंह राजपूतची बहिण श्वेता लेखिका आहे. तिने पेन (Pain) नावाचं पुस्तक देखील लिहिलंय. त्यात तिने अध्यात्मिक साधना आणि भक्तीचे अनुभव सांगितले आहेत. प्रियजनांपासून वेगळं झाल्यानंतर दु:ख कसं सहन करायचं? यावर त्यात भाष्य केलं आहे.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती पॉडकास्टमधील मुलाखतीवर आधारित आहे. झी 24 तास अंधश्रद्धेला वाव देत नाही)