सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी `या` लोकांची होऊ शकते चौकशी
सुशांतने आत्महत्याचं केल्याचं शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झालं.
मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या Sushant Singh Rajput आत्महत्येनंतर आता मुंबई पोलीस सुशांतची कथित प्रेयसी रिया चक्रवर्तीची Rhea Chakraborty चौकशी करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
त्याशिवाय, सुशांतने शेवटचा कॉल त्याचा मित्र महेश शेट्टीला केला होता. रात्री 3च्या सुमारास त्याने महेशला कॉल केला होता, मात्र महेशने कॉल उचलला नसल्याने सुशांतचं त्याच्याशी बोलणं झालं नव्हतं. सुशांतच्या मॅनेजरला सुशांतच्या फोनच्या पासवर्ड माहित होता. मॅनेजरने पासवर्ड काढल्यानंतर, सुशांतने रात्री 3 वाजता महेशला शेवटचा कॉल केल्याचं समजलं. त्यामुळे पोलीस महेश शट्टीचीही चौकशी करु शकतात.
सुशांतच्या आत्महत्येनंतर इंडस्ट्रीतील प्रस्थापितांवर कंगनाचा खळबळजनक आरोप
सुशांतच्या बहिणीने, गेल्या 5 महिन्यांपासून सुशांतच्या डिप्रेशनवर इलाज सुरु असल्याचं सांगितलं. 5 दिवसांपूर्वी त्याचं बहिणीशी फोनवर बोलणं झालं होतं. त्यावेळी सुशांतने त्याची तब्येत ठीक नसल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर सुशांतची बहीण त्याच्या वाद्र्यांच्या घरी आली होती. ती 2 दिवस त्याच्याकडे राहिलीही होती. सुशांतने डिप्रेशनची औषधं खाणं बंद केल्याची माहिती मिळत आहे. सुशांतच्या मित्रांनी आणि कुकने, सुशांतचं वागणं काहीसं असामान्य होतं आणि तो डिप्रेशनमध्ये असल्याचं सांगितलं.
सुशांतच्या आत्महत्येनंतर मुंबईतील कूपर रुग्णालयात त्याचं शवविच्छेदन करण्यात आलं. सुशांतने आत्महत्याचं केल्याचं शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झालं. सोमवारी सुशांतच्या पार्थिवावर विलेपार्ले येथील स्मशानभूमीत साडे चार वाजण्याच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. सुशांतला शेवटचा निरोप देण्यासाठी बॉलिवूड, टीव्ही इंडस्ट्रीतील अनेत कलाकार-मात्र उपस्थित होते.