मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी पोलीस सखोल चौकशी करत आहेत. सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीचा मित्र आणि सिनेमा दिग्दर्शक रुमी जाफरीची देखील पोलिसांनी चौकशी केली. यातून महत्वपूर्ण माहिती समोर आलीय. सुशांत आणि रियाला घेऊन तो एक सिनेमा शूट करणार असल्याचे त्याने सांगितले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याची शूटींग लंडनमध्ये सुरु होणार होती. पण लॉकडाऊनमुळे काम सुरु झाले नाही. या सिनेमाची स्टोरी ऐकवण्यासाठी तो ३ वेळा सुशांतला भेटला होता. सुशांतच्या डिप्रेशनबद्दल साधारण ६ महिन्यांपुर्वी रियाकडून आपल्याला कळाल्याचे रुमीने सांगितले. मिटींगवेळी तो प्रोफेशनल आणि सिनेमाबद्दल बोलत होता. वैयक्तिक आयुष्याबद्दल तो कधी बोलला नाही. तसेच नेपोटीझ्म किंवा त्याच्याकडून सिनेमा निघून चालल्याबद्दल देखील उल्लेख चर्चेत केला नसल्याचे रुमीने सांगितले. 


काही महिन्यांपासून फिल्म प्रोडक्शनसोबत बोलताना सुशांत डिप्रेशनमध्ये असल्याचे दिसून येते.



सुशांतवर सिनेमा 


‘Suicide or Murder' चित्रपटाचा पहिला पोस्टर प्रदर्शित करण्यात आला. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर चित्रपट निर्माते विजय शेखर गुप्ता यांनी सुशांतच्या जीवनावर आधारित चित्रपट तयार करण्याची जबाबदारी घेतली आहे. चित्रपटात अभिनेता सचिन तिवारी मुख्य भूमिकेत दिसणार आहे.


चित्रपटाची कथा फक्त सुशांतच्या जीवनावर बेतलेली नसुन, त्या प्रत्येक कलाकाराची आहे जो एकटा या कलाविश्वात आपलं नशिब आजमावण्यासाठी आला. पण बॉलिवूडमध्ये असलेल्या घराणेशाहीचा शिकार बनला. असं वक्तव्य विजय शेखरने झी न्यूजसोबत बोलताना केलं आहे.


सुशांतने  ज्या परिस्थितीचा सामना केला आहे. मानसिक तणाव, त्याच्याकडून काढून घेण्यात आलेले चित्रपट अशा सर्व गोष्टींभोवती चित्रपटाची कथा फिरताना दिसणार आहे. 'हा चित्रपट फक्त एक बायोपिक नसून सुशांतचं जीवन प्रेरित करणार आहे. शिवाय या चित्रपटाच्या मध्यमातूम कलाविश्वातील अनेक बारकावे समोर येणार आहेत.' असं वक्तव्य चित्रपटाच्या दिग्दर्शकाने केलं आहे.