Sushant Singh Rajput Death Case : अभिनेता सुशांत सिंह राजपूत (sushant singh rajput) यानं वयाच्या 34 व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला. आत्महत्येचं अगदी टोकाचं पाऊल उचलत त्यानं आपलं आयुष्य संपवून टाकलं. मात्र सुशांत सिंगच्या राजपूतच्या मृत्यूचे गूढ काळानुसार अधिकच गुंतागुंतीचे होत आहे. दरम्यान सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात आता कूपर हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांने नवा खुलासा केला आहे. 


14 जून 2020 रोजी राहत्या घरी आत्महत्या


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या (Sushanth Singh Rajput) निधनाला दोन वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. तरी देखील त्याच्या संबंधित अनेक चर्चा आजही सुरु असतात. 14 जून 2020 रोजी सुशांतनं मुंबईतील राहत्या घरात आत्महत्या केली. यानंतर इंडस्ट्रीत एकच शोककळा पसरली होती. त्यानंतर आता सुशांत राजपूतची 101 टक्के हत्याच झाली होती, अशा खुलासा कूपर हॉस्पिटलमधील कर्मचारी  रुपकुमार शाह यांनी केले आहे. 


वाचा: श्रद्धाचे 35 तुकडे करणाऱ्या आफताबविरुद्ध पोलिसांच्या हाती मोठा पुरावा 


हातापायाला मार लागलेला माणूस गळफास घेऊ शकत नाही


रुपकुमार शाह यांनी सांगितले की, सुषांतचा मृतदेह पाहिल्यावर ही हत्या असल्याचे दिसून आले. हातापायाला मार लागलेला माणूस गळफास लावून घेऊ शकत नाही. सुशांतने आत्महत्या केली असावी हे मला पटलं नाही. याबाबत मी वरिष्ठांन कळवलं होते. तेव्हा केवळ पोस्टमोर्टम करून द्या असं काम होतं ते करून दिले असं त्यांनी म्हटले.  


तसेच सुशांतच्या मृतदेहाचे पोस्टमोर्टम करण्यावेळी पूर्णवेळ मी तिथेच होतो. पोस्टमोर्टमवेळी 2 महिला आणि 3 पुरूष डॉक्टर होते. आमच्यात संभाषण झाले होते. ही हत्या असल्याची चर्चा झाली. तेव्हा तुम्ही तुमचं पोस्टमोर्टमचं काम करा, आम्ही अहवाल बनवतो असं डॉक्टरांनी म्हटलं. त्यातप्रमाणे आम्ही मृतदेहावर पोस्टमोर्टम केले. जे काही नमुने हो ते पोलिसांकडे सुपूर्द केले असं शाह यांनी सांगितले.


मी आजही घाबरलेल्या अवस्थेत आहे


यासर्व प्रकरणावरून 101 टक्के ही आत्महत्या नसून हत्याच होती. तुम्ही सुशांतचा मृतदेह निरखून पाहिला तर हे दिसून येईल. आज माझं 60 वर्ष वय आहे. माझं कुटुंब आहे. माझाही मृतदेह तिथेच आला तर काय, मी आजही घाबरलेल्या अवस्थेत आहे. आता मुख्यमंत्री या प्रकरणावर लक्ष देऊन आहेत त्यामुळे मी पुढे येऊन बोलत आहे. सुशांत सिंह राजपूतला न्याय मिळावा यासाठी मी पुढे आलोय असं रुपकुमार शाह यांनी सांगितले.