मुंबई : बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतने आत्महत्या केल्यामुळे खळबळ उडाली आहे. डिप्रेशनमुळे सुशांत सिंग राजपूतने आत्महत्या केल्याचं प्राथमिक कारण समोर आलं आहे. कोरोना लॉकडाऊनच्या दरम्यान अनेक सेलिब्रिटींनी आत्महत्या केल्याची प्रकरणं समोर आली आहेत.


मनमीत ग्रेवाल 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीव्ही अभिनेता मनमीत ग्रेवाल याने मागच्या महिन्यात आर्थिक अडचणींमुळे आत्महत्या केली. 'आदत से मजबूर' आणि 'कुलदीपक' यासारख्या कार्यक्रमातून मनमीत घराघरात पोहोचला. मनमीतने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं त्याचा मित्र मनजीत सिंग राजपूतने सांगितलं. मनमीत ग्रेवाल हा फक्त ३२ वर्षांचा होता. गेल्या काही दिवसांपासून मनमीतला पैशांची चणचण भासत होती, अशी प्रतिक्रिया त्याच्या मित्रांनी दिली.


 


प्रेक्षा मेहता


क्राईम पेट्रोल मालिकेतून ओळख मिळवणारी टीव्ही अभिनेत्री प्रेक्षा मेहतानेही लॉकडाऊनदरम्यान इंदूरमध्ये घरात फाशी घेऊन आत्महत्या केली. मागच्याच महिन्यात प्रेक्षानेही पंख्याला लटकून आपलं आयुष्य संपवलं. प्रेक्षा क्राईम पेट्रोल, मेरी दुर्गा आणि लाल इश्क या मालिकांमध्ये होती. २५ वर्षांच्या प्रेक्षाला काम मिळत नसल्यामुळे तिच्यावर तणाव होता, यातूनच तिने टोकाचं पाऊल उचलल्याचं सांगितलं जातं.



दिशा सालियान


५ दिवसांपूर्वीच सुशांत सिंग राजपूतची मॅनेजर दिशा सालियाननेही १४व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. दिशा आपल्या होणाऱ्या नवऱ्यासोबत मुंबईच्या मालाडमध्ये राहत होती. दिशाला बोरिवलीच्या हॉस्पिटलमध्येही नेण्यात आलं, पण तिकडे तिला मृत घोषित करण्यात आलं.