Sushant Singh Rajpu Death Case:  अभिनेता सुशांत सिंग राजपूतने 14 जून 2020 रोजी घरात गळफास घेऊन आत्महत्या (Sushant Singh Rajput's death) केली. या घटनेला आता अडीच वर्षांहून अधिक कालावधी लोटला आहे. पण त्याच्या मृत्यूचं कोड अद्याप उलगडलेलं नाही. सुशांत सिंगने (Sushant Singh Rajput Suicide) आत्महत्य केली की हत्या करण्यात आली यावरुन दावे-प्रतिदावे सुरुच आहेत. आता या प्रकरणी कूपर रुग्णालयातील (Cooper Hospital) कर्माचाऱ्याने खळबळजनक दावा केला आहे. यानंतर आता सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीची गूढ पोस्ट समोर आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या अनेक महिन्यांपासून सुशांतचे प्रकरणतात काही चर्चा नव्हती.  मात्र अलीकडेच हे प्रकरण पुन्हा समोर आले आहे. कारण कूपर हॉस्पिटलच्या (Cooper Hospital) शवविच्छेदन कर्मचार्‍यांनी अभिनेत्याची हत्या झाल्याचा खळबळजण दावा केला. यानंतर आता अभिनेत्री रिया चक्रवर्तीनं (Rhea Chakraborty) देखील एका सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. रिया सुशांत मृत्यू प्रकरणात संशयीत आरोपी आहे. त्यामुळं तिची ही पोस्ट सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.


रियाने पोस्टमध्ये काय लिहिले?


या खळबळजनक दाव्यानंतर सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीची गूढ पोस्ट समोर आली आहे. रियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीला एक पोस्ट शेअर केली आहे. 'तुम्ही आगीवर चालला आहात, अनेक शत्रूंचा सामना केला आहे, पुरामध्ये देखील तुम्ही तुमचा जीव वाचवला आहे. त्यामुळे जेव्हा कधी तुम्हाला स्वत:च्या ताकदीवर शंका निर्माण होईल या गोष्टी आठवा' अशी पोस्ट रियाने केली आहे. तिच्या या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले आहे.



वाचा : भारतात Corona ची चौथी लाट सुरू झाली? काय म्हणाले AIIMS चे संचालक 


 2018 च्या अखेरीस रिया आणि सुशांत रिलेशनशिपमध्ये आले होते. तर 2019 च्या सुरुवातीला दोघेही लिव्ह-इनमध्ये राहू लागले होते. जरी दोघेही त्यांच्या नात्याबद्दल  कधीच उघडपणे बोलले नव्हते.  परंतु सुशांतच्या मृत्यूच्या एका महिन्यानंतर तिने सोशल मीडियावर स्वतःला त्याची गर्लफ्रेंड असल्याचे उघडपणे सांगितले होते. रियामुळेच सुशांतचा मृत्यू झाल्याचा आरोप सुशांतच्या वडिलांनी केला आहे. रिया आणि तिच्या भावावरही सुशांतला ड्रग्ज दिल्याचा आरोप होता. रियालाही तुरुंगवास भोगावा लागला. आता रिया तुरुंगातून बाहेर आली आहे आणि नवीन आयुष्य सुरू करत आहे.


सुशांतच्या मृत्यूवर काय होता दावा?


सुशांतचे पोस्टमॉर्टम मुंबईतील कूपर हॉस्पिटलमध्ये झाले. या रुग्णालयातील एका कर्मचाऱ्याचे वक्तव्य नुकतेच समोर आले. सुशांतचा मृतदेह पाहून हे आत्महत्येचे प्रकरण आहे असे वाटले नाही, असा दावा कर्मचारी सदस्याने केला. ANI शी  बोलताना रूपकुमार शाह म्हणाले, जेव्हा सुशांतचा मृत्यू झाला तेव्हा आम्हाला कूपर हॉस्पिटलमध्ये पोस्टमार्टमसाठी 5 मृतदेह मिळाले होते. त्यापैकी एक व्हीआयपी बॉडी होती. जेव्हा आम्ही पोस्टमॉर्टमसाठी गेलो तेव्हा आम्हाला कळले की हा मृतदेह सुशांत सिंग राजपूतचा आहे. त्याच्या शरीरावर अनेक खुणा होत्या. मानेवर दोन-तीन खुणाही होत्या. सुशांतचे शरीर वेगळेच दिसत होते. मी माझ्या वरिष्ठांकडे गेलो आणि म्हणालो की हे आत्महत्येचे प्रकरण दिसत नाही. सुशांतच्या मानेवरची खूण फासावर लटकलेली दिसत नव्हती.


रूपकुमार शाह यांनी सांगितले होते की, त्यांच्या वरिष्ठांनी सुशांतच्या पोस्टमॉर्टमशी संबंधित ही महत्त्वाची माहिती टाळली होती. यावर नंतर बोलू, एवढेच सांगितले. रूपकुमार शाहच्या या दाव्यानंतर सुशांत सिंह राजपूतच्या बहिणींकडून लगेच प्रतिक्रिया आल्या. अभिनेत्याची बहीण श्वेता सिंग कीर्ती हिने रूपकुमारच्या सुरक्षेची मागणी केली. श्वेताने आपल्या ट्विटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना टॅग केले.