मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील 'ड्रग्स प्रकरण' सध्या चांगलचं गाजत आहे. या प्रकणाची साखळी दिवसागणिक वाढत असल्याचं चित्र समोर येत आहे.  बॉलिवूडमधील ड्रग्स प्रकरणी आज अभिनेत्री दीपिका पादुकोण, सारा अली खान आणि श्रद्धा कपूरची चौकशी करण्यात आली. सुमारे ५ तास एनसीबीने दीपिकाची चौकशी केली. त्यानंतर दीपिकाची मॅनेजर करिश्मा प्रकाश सोबत आमने-सामने चौकशी करण्यात आली. त्याचप्रमाणे सारा आणि श्रद्धाची साडे पाच तास चौकशी करण्यात आली. चौकशी दरम्यान  श्रद्धा कपूरनंतर साराने देखील सुशांत ड्रग्स घेत असल्याची कबुली दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चौकशी दरम्यान सारा आणि श्रद्धाला ड्रग्ससंबंधी अनेक प्रश्न विचारण्यात आले. यामध्ये पवाना लेक पार्टीविषयी देखील चौकशी करण्यात आली.  'केदारनाथ' चित्रपटाच्या नंतर सारा अली खानकडून सुशांतबरोबर सुट्टी घालवण्याबद्दल प्रश्न विचारले गेले होते.


साडे पाच तास सुरू असलेल्या या चौकशी दरम्यान श्रद्धाला 'छिछोरे' चित्रपटाच्या यशाबद्दल आणि पुण्यात शूटिंगनंतर हँगआउट व्हिलामध्ये ठेवण्यात आलेल्या पार्टीसंबंधी विचारणा करण्यात आली. दरम्यान, एनसीबीने श्रद्धा कपूरची कसून चौकशी केली. श्रद्धा आणि साराने स्वतः ड्रग्जचं सेवन करत असल्याचा आरोप फेटाळला आहे. 


पवना धरणात झालेल्या पार्टीची कबुलीही श्रद्धाने चौकशीत दिल्याची माहिती आहे. मात्र तिथे आपण ड्रग्ज सेवन केलं नाही असं श्रद्धाने म्हटलंय. मात्र जया साहाशी झालेल्या सीबीडी ऑईलबाबतच्या व्हॉट्सअप चॅटबाबत तिने नकार दिलाय.