मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने १४ जून रोजी त्याच्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली . त्याच्या आत्महत्येनंतर सोशल मीडियावर बॉलिवूडमधील घराणेशाहीवरून अनेक वाद निर्माण होत आहेत. त्याच्या आत्महत्येप्रकरणी पोलीस देखील कसून चौकशी करत आहेत. चौकशी दरम्यान पोलिसांना एक नवा पुरावा सापडला आहे. सुशांतने आत्यहत्या करण्यासाठी प्रथम बाथरॉब बेल्टचा वापर केला. परंतु त्याचा पहिला प्रयत्न अयशस्वी ठरला. त्यानंतर त्याने हिरव्या कपड्याचा वापर केल्याचे सांगण्यात येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता पोलिसांना चौकशीत हे जाणून घ्यायचे आहे की कुर्ता सुशांतचे वजन सावरू शकत होता की नाही. याप्रकरणी पुढील तपास कलिना फॉरेन्सिक लॅबमध्ये करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. सुशांतच्या आत्महत्येमुळे कलाविश्वाला त्याचप्रमाणे त्याच्या चाहत्यांना देखील मोठा फटका बसला आहे. 



पोलिसांच्या म्हणण्यानुसार, ज्यावेळी पोलिस तपासाणीसाठी दाखल झाले तेव्हा त्यांना थोडा संशय आला, जेव्हा बाथ रोब बेल्ट २ तुकड्यांमध्ये आढळून आला.  अशा परिस्थितीत कदाचित सुशांत गळफास लावण्यासाठी बाथ रोब बेल्ट त्याचं वजन सावरू शकेल  की नाही हे तपासत होता. 


त्यानंतर  पोलीस तपासात त्याचा कपड्यांचा कपाट खुला असून कपडे विखुरलेले होते. बाथ रोब बेल्टचे २ तुकडे झाल्यामुळे सुशांतने गळफास घेण्यासाठी हिरव्या कुर्त्याचा वापर केल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.