मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी अभिनेत्री रिया चक्रवर्तीला ड्रग्जप्रकरणी ८ सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली.  सुशांतला त्याच्या बहिणींनी डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनविना औषधे दिली असा आरोप करत अभिनेत्री रिया चक्रवर्तीने त्यांच्याविरोधात एफआयआर नोंदवला आहे. तो रद्द करण्याची विनंती करणारी फौजदारी रिट याचिका दोघींनी केली आहे. परंतु सुशांतसिंह राजपूतच्या बहिणी प्रियांका आणि मीतू सिंग यांच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार दिला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या पोलिसांचा तपास सुरू असल्याने आम्ही त्यात हस्तक्षेप इच्छित नाही. त्यामुळे या टप्प्यावर तातडीने सुनावणी घेण्याचे कारण दिसत नाही. असं उच्च न्यायालयाकडून सांगण्यात आलं आहे.  पोलिसांचा तपास सुरू असल्याने तातडीच्या सुनावणीस उच्च न्यायालयाने नकार दिला आहे.


दरम्यान, तक्रारदार रिया चक्रवर्तीच्या वकिलांसह एफआयआरविषयी तपास करत असलेल्या सीबीआयला एक आठवड्यात उत्तर दाखल करण्यासाठी मुदत देऊन हायकोर्टाने सुनावणी पुढील मंगळवारी ठेवली आहे


रिया सध्या भायखाळा तुरूंगात बंद आहे. आज पुन्हा रिया आणि शौविक सह इतर आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे.  रियासह शौविक, सॅम्युअल मिरांडा, दिपेश सावंत, बासित परिहार आणि झैद विलात्राच्या न्यायालयीन कोठडीत २० ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे.