मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील नेपोटीझ्म, वर्चस्ववादावर प्रश्न उभे राहीले आहेत. सलमान खान, करण जोहर, आलिया, सैफ अली खान यांना सोशल मीडियत ट्रोल केलं जातंय. पण आता सलमान खान, करण जोहर, एकता कपूर, संजय लिला भन्साली, साजिद नाडियावाला या पाचजणांवर आता कायदेशीर कारवाईचा बडगा उभारला जाणार आहे. उत्तर प्रदेशच्या जौनपूर येथील न्यायालयात यासंदर्भात खटला दाखल करण्यात आलाय. सुशांत सिंहला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप सलमान, करणसह पाचजणांवर ठेवण्यात आलाय. त्यामुळे यांना न्यायालयीन कार्यवाहीला सामोरे जावे लागणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वकील हिमांशू श्रीवास्तव यांनी यासंदर्भात खटला दाखल केलाय. अभिनेत्री कंगना राणौतने व्हिडीओ बनवून सुरुवातीपासून याप्रश्नावर आवाज उठवलाय. गायक सोनू निगम यांनी देखील हे न रोखल्यास आणखी कोणी आत्महत्या होईल अशी भीती वर्तवली आहे. प्रस्थापित अभिनेते, दिग्दर्शक, प्रोडक्शन कंपन्यांविरोधात सोशल मीडियात आवाज उठवला जातोय.


सुशांतच्या आत्महत्येनंतर सलमानचे पोस्टर्स जाळण्यात आले. बिहारमध्ये सलमानच्या बिईंग ह्यूमन या आऊटलेटवर सुशांतच्या चाहत्यांनी हल्ला चढवला. जागोजागी लागलेले सलमानचे पोस्टर्सदेखील फाडून टाकण्यात आले. 



'दबंग'चा दिग्दर्शक आणि अनुराग कश्यपचा भाऊ अभिनव कश्यप याने सलमान आणि त्याच्या परिवारावर आरोप केलेयत. दरम्यान गायक सोनू निगम याने देखील सलमानवर हल्ला चढवला.


दोन व्यक्तींचा संगीतक्षेत्रातही दबदबा असून कोणी काय गायचं हे ठरवलं जातं. यामुळे संगीत क्षेत्रावर परिणाम होईल. या क्षेत्रातही आत्महत्या होऊ शकते असेही सोनू निगमने स्पष्ट केले.