मुंबई : तुम्हाला 'झी मराठी' या चॅनलवर प्रसारित झालेली 'रात्रीस खेळ चाले' कार्यक्रमात दिसलेली 'सुशल्या' नक्कीच आठवत असेल? होय, सध्या 'बिग बॉस मराठी'मध्ये दिसत असलेली ऋतुजा धर्माधिकारी... 'रात्रीस खेळ चाले' ही ऋतुजानं केलेली पहिलीच मालिका... पण, प्रेक्षकांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेण्यास ऋतुजा यशस्वी ठरली. मनानं हळवी... पण परिस्थितीमुळे कणखर बनायला लागलेली 'सुशल्या' ऋतुजा उत्तमरित्या रंगवली होती. 


संघर्षमय प्रवासाची कथा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'बिग बॉस मराठी' या कार्यक्रमात नॉमिनेट झालेल्या सदस्यांनी आपल्या आयुष्यातील नियतीच्या अनपेक्षित वळणांची आणि संघर्षातून मिळवलेल्या यशाची गोष्ट सहसदस्यांना सांगायची होती. यावेळी ऋतुजानं आपल्या संघर्षमय प्रवासाची कथा पहिल्यांदा उघडपणे व्यक्त केली. महत्त्वाचं म्हणजे, बिग बॉसच्या घरात उपस्थित असलेल्या सदस्यांपैंकी ऋतुजा सर्वात लहान सदस्य ठरलीय. ती केवळ २२ वर्षांची आहे. 


सांगताना ऋतुजा झाली भावूक


ऋतुजा मुळची औरंगाबादची... छोटं शहर असलेल्या औरंगाबाद मुंबई - पुण्यासारखं वातावरण नव्हतं... पण, अभिनय क्षेत्राची लहानपणापासून आवड होती. डान्सचंही वेड होतंच. बारावीनंतर तर शिक्षणातला रस उडाला आणि अभिनय क्षेत्रात येण्याचं पक्कं केलं. या निर्णयामुळे घरच्यांना मात्र चांगलाच धक्का बसला... सगळे नाराज झाले... हे सांगताना ऋतुजाचे डोळे भरून आले.



धकाधकीचा प्रवास


अभिनय क्षेत्रात येण्याचा निश्चय ठाम होता... आणि संघर्षाला सुरुवात झाली... पुण्यामध्ये 'एमए इन ड्रामा'साठी प्रवेश घेतला. त्याचवेळी ऑडिशनसाठी मुंबईत यावं लागत होतं... मग एका दिवसात पुणे - मुंबई - पुणे असा धकाधकीचा प्रवास सुरू झाला. सकाळी ऑडिशनसाठी मुंबईला येऊन पुन्हा पुण्यात जावं लागत होतं. पण, या काळात आई-वडिलांकडे मदत मागू शकत नव्हते. त्यांनी फ्रीडम दिला होता... पण, त्याच दरम्यान आयुष्यातला एक टर्निंग पॉईंट आला. 


आयुष्याचा टर्निंग पॉईंट


'रात्रीस खेळ चाले'मध्ये भूमिका मिळाली... या सिरियलमुळे ऋतुजाला तिच्या नावानं नसलं तरी तिनं साकारलेल्या भूमिकेच्या नावानं लोक ओळखायला लागले... हाच सुशल्याच्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट ठरला.