मुंबई : सुष्मिता सेनने डिसेंबर 2021 मध्ये एक पोस्ट शेअर करून तिच्या आणि रोहमनच्या ब्रेकअपच्या बातमीचं Confirmation दिलं. त्यावेळी दोघांच्या नात्याबद्दल अनेक बातम्या समोर येत होत्या. ज्या नंतर खऱ्या ठरल्या. रोहमनसोबतचा फोटो शेअर करत सुष्मिताने लिहिलं की, आम्ही मैत्रीपासून सुरुवात केली आणि आम्ही नेहमीच मित्र राहू. हे नातं नक्कीच संपलं पण प्रेम नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता या प्रेमाच्या जिवंतपणाचा पुरावा अनेकवेळा पाहायला मिळत आहे. दररोज हे एक्स कपल एकत्र रोमँटिक डेटवर जातात. यावेळीही हेच घडलं, मात्र यावेळी वेगळं चित्र पहायला मिळालं. रोहमनने कॅमेऱ्यांपासून स्वत:ला लपवून ठेवलं.


खरं तर,अलीकडेच सुष्मिता सेन तिच्या एक्स बॉयफ्रेंड रोहमन शॉलसोबत वांद्रेमध्ये स्पॉट झाली होती. दोघंही कारमध्ये  एकत्र बसलेले दिसले, मात्र यादरम्यान रोहमनने कॅमेऱ्यांसमोर स्वत:ला लपवायला सुरुवात केली. दोघांच्या या खास भेटीचा व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. पुन्हा एकदा त्यांची गाडी रुळावर येऊ लागली आहे का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.


ब्रेकअप झाल्यानंतरही दोघंही एकमेकांपासून वेगळे राहू शकले नाहीत. या दोघांचे क्यूट फोटो पाहून चाहत्यांना खूप आनंद होत आहे आणि त्याचबोरबर या दोघांमध्ये सगळं काही असंच राहावं आणि लवकरच दोघंही रिलेशनशिपमध्ये परतावेत अशी प्रार्थना त्यांचे चाहते करत आहेत.



अडीच वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर सुष्मिता आणि रोहमन वेगळे झाले आहेत. सुष्मिता आणि रोहमनच्या वयात 15 वर्षांचं अंतर आहे. सुष्मिता 46 वर्षांची आहे, तर रोहमन 30 वर्षांचा आहे. पण हे वय कधीच त्यांच्यात भिंत म्हणून उभी राहिलेली नाही.